खळबळजनक! मोबाईल पाहताच आला कोरोनाचा अलर्ट

खळबळजनक! मोबाईल पाहताच आला कोरोनाचा अलर्ट

आरोग्य सेतु App

दिवसेंदिवस कोरोनामुळे सर्वांच्याच मनात भीतीचे वातावरण पसरले आहे. कोणत्याही गोष्टीला हात लावताना त्याठिकाणी कोरोनाचा विषाणू तर नाही ना, असा प्रश्न प्रत्येकाला पडत आहे. मात्र, एका बँक कर्मचाऱ्याच्याच मोबाईलवर कोरोनाचा अलर्ट आला आणि एकच खळबळ उडाली. गाझियाबादमधील एका बँकेमधील कर्मचाऱ्याच्या मोबाईमधील आरोग्य सेतु अ‍ॅपवर तुमच्या आजूबाजूला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगत सतर्कता पाळण्यास सांगितली आणि सर्वांचीच घाबरगुंडी उडाली.

नेमके काय घडले?

गाझियाबादमधील विजयनगर पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या एसबीआय बँकेच्या शाखेत मंगळवारी एका कर्मचाऱ्याच्या मोबाईलमधील आरोग्य सेतु अ‍ॅपवर तुमच्या आजूबाजूला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अलर्ट देण्यात आला. या घटनेची माहिती कर्मचाऱ्यांनी बँक मॅनेजरला दिली. त्यानंतर मॅनेजरने ही माहिती स्थानिक प्रशासनाला दिली आणि त्यानंतर बँकेचे सर्व काम थांबविण्यात आले. तात्काळ कर्मचाऱ्यांसह बँकेत असलेल्या सर्वांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली आणि बँक रिकामी झाल्यानंतर जीडीएच्या पथकाने बँकेचे निर्जंतुकीकरण केले.

काही कर्मचार्‍यांच्या मोबाइलवर कोरोना पॉझिटिव्हचा अलर्ट आला. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने बँकेत उपस्थित असलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर जीडीएच्या टीमने संपूर्ण बँकेचे निर्जंतुकीकरण केले. परंतु आरोग्य विभागाचा एकही अधिकारी याठिकाणी पोहोचला नाही.  – कुंदन कुमार, बँकेचे शाखा व्यवस्थापक


हेही वाचा – बँकेत जाऊन पैसे काढण्याची चिंता सोडा; घरबसल्या पैसे मिळवा


 

First Published on: April 28, 2020 10:43 PM
Exit mobile version