१० जूनपासून नवीन नियम लागू, एसबीआय ग्राहकांना लाभ मिळणार

१० जूनपासून नवीन नियम लागू, एसबीआय ग्राहकांना लाभ मिळणार

SBI Notification 2021: एसबीआयमध्ये ऑफिसर पदासाठी मोठी भरती, ४० हजारांपेक्षा अधिक पगार, असा करा अर्ज

जर आपण स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. एसबीआयचा एक नवीन नियम १० जूनपासून लागू होणार आहे. लाखो ग्राहक याचा लाभ घेऊ शकतात. एसबीआयने १० जूनपासून फंडाचा मार्जिनल कॉस्ट बेस्ड इंटरेस्ट रेट (एमसीएलआर) मध्ये ०.२५ टक्के कपात करण्याची घोषणा केली आहे. या वजावटीनंतर एक वर्षाच्या कालावधीचा एमसीएलआर दर ७.२५ टक्क्यांवरून ७ टक्के करण्यात आला आहे.

एमसीएलआर दर सलग १३ वेळा बँकेने कमी केला आहे. यापूर्वी एसबीआयने बाह्य बेंचमार्क व्याज दर (ईबीआर) ७.०५ टक्क्यांवरून वार्षिक ६.६५ टक्क्यांवर आणला. त्याचबरोबर रेपो दराशी संबंधित व्याज दर ६.६५ टक्क्यांवरून ६.३५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. तथापि, हे नवीन दर जुलैमध्ये लागू होतील.

ग्राहकांचा फायदा काय?

बँकेच्या निवेदनात म्हटलं आहे की, “एमसीएलआर दराशी संबंधित गृह कर्जाची समान मासिक हप्त्याची रक्कम ४२१ रुपयांनी कमी केली जाईल. त्याचबरोबर ईबीआर, आरएलएलआर लिंक्ड होम लोनचा मासिक हप्ता ६६० रुपयांनी कमी केला जाईल. ही गणना ३० वर्षांच्या कालावधीसाठी २५ लाख रुपयांपर्यंतच्या गृह कर्जावर केली गेली आहे.”


हेही वाचा – केजरीवाल यांची आज कोरोना चाचणी होणार


कोरोना संकटामध्ये कर्ज वितरणावर भर देण्यात येत आहे. यासाठी केंद्रीय रिझर्व्ह बँकेकडून बँकांनाही प्रोत्साहन दिलं जात आहे. यामुळेच रिझर्व्ह बँकेने लॉकडाऊनमध्ये रेपो दर दोनदा कमी केला आहे. सध्या रेपो दर ४ टक्के आहे जो आतापर्यंतची सर्वात निम्न पातळी आहे. यासह आरबीआयने बँकांना त्याचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यास सांगितलं आहे.

 

First Published on: June 9, 2020 11:22 AM
Exit mobile version