एसबीआय बँकेतील ग्राहकांची माहिती झाली लीक

एसबीआय बँकेतील ग्राहकांची माहिती झाली लीक

SBI New Scheme: स्वस्त दरात होम लोनपासून ते Fixed deposit रकमेवर ग्राहकांना मिळणार लाभ

देशातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व्हर खुले असल्याची घटना घडल्याचा दावा ‘टेक क्रंच’ या वेबसाइटने केला आहे. यामुळे एसबीआयच्या ग्राहकांचा खासगी डेटा लीक झाल्याची भिती वर्तवली जात आहे. एसबीआयच्या मुंबई विभागीय सर्व्हर खुले असल्याची माहिती उघकीस आली. यानंतर बँकेकडून याची दखल घेण्यात आली, नंतर सर्व्हरला लॉक करण्यात आले. मात्र या दरम्यानच्या काळात या सर्व्हरमधून अनेकांचे बँक खाते क्रमांक, खात्यातील बॅलेन्स आणि खात्यांचे व्यवहार याबद्दल माहिती सहज बघू शकता येत होती. यावर अद्याप एसबीआय बँकेकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र माहिती लीक झाल्यामुळे आता एसबीआयच्या खातेदारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सर्व्हर खुला असल्याचे फोटो केले शेअर्स

बँक हे सर्व्हरचा पासवर्ड टाकण्यास विसरले होतं. यामुळे ज्यांना सर्व्हरमधून ग्राहकांची माहिती कशी मिळवली जाते याची कल्पना आहे त्यांनी याचा गैरवापर केल्याची शक्यता आहे. सर्व्हर किती वेळासाठी सुरक्षेविना होता याची माहिती मिळू शकली नाही मात्र, सर्व्हर खूला असल्याचे फोटो टेक क्रंच या वेबसाइटने टाकले आहे.

एसबीआयचा सर्व्हर

चुकीचा वापर होण्याची भिती

वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार सुरक्षा नसलेला सर्व्हर हा बँकेच्या SBI Quick सेवेचा एक भाग होता. यावरून ग्राहक समान्य माहिती मिळण्यासाठी मॅसेज किवा मिस काँल देऊन ही माहिती मिळवू शकतात. बँकेने आपल्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार SBI Quick – MISS Call Banking ही एक मोफत सेवा आहे. ही सेवा एसबीआय खातेदारांना बँकेकडून पुरवली जाते. ही सेवा थेट ग्राहकांच्या मोबाइल फोनशी संलग्न असल्याने सर्व्हरमधून लीक झालेला डाटा वापर चुकीच्या पद्धतीने होऊ नये याची भिती वर्तवली जात आहे.

First Published on: January 31, 2019 11:36 AM
Exit mobile version