बँकिंग क्षेत्रात सुवर्णसंधी! SBI बँकेत ३ हजार ८५० रिक्त जागांसाठी भरती सुरु

बँकिंग क्षेत्रात सुवर्णसंधी! SBI बँकेत ३ हजार ८५० रिक्त जागांसाठी भरती सुरु

SBI Notification 2021: एसबीआयमध्ये ऑफिसर पदासाठी मोठी भरती, ४० हजारांपेक्षा अधिक पगार, असा करा अर्ज

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभर लॉकडाऊन लागू करण्यात आलं. यामुळे जगावर आर्थिक संकट निर्माण झालं. लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे बंद होते. यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. दरम्यान आता बँकिंग क्षेत्रात सुवर्णसंधी आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ऑफिसर पदांसाठी भर्ती सुरु केली आहे. ३ हजार ८५० पदांसाठी ही भरती असणार आहे.

SBI च्या अधिकृत वेबसाईटवर ऑफिसर पदाच्या भरतीचे नॉटिफिकेश जारी करण्यात आलं आहे. SBI मध्ये या वर्षी ३ हजार ८५० सीबीओ (सर्कल बेस्ड ऑफिसर) पदांची भरती केली जाणार आहे. उमेदवार SBI च्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या लिंकच्या माध्यमातून २७ जुलै २०२० ते १६ ऑगस्ट २०२० या कालावधीत या पदांसाठी अर्ज करु शकतील.

अर्ज करण्यासाठी उमेदवाराची पात्रता

१) उमेदवाराचे वय ३० वर्षांपेक्षा अधिक नसावे.

२) उमेदवार मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून पदवीधर असावा.

३) राज्यातील जागांवर अर्ज करणाऱ्या उमेदवाराला तेथील स्थानिक भाषेची माहिती असणे आवश्यक. त्यासाठी पुरावा म्हणून त्यांना १० वी किंवा १२ वीचा निकाल दाखवावा लागेल.

४) ज्या उमेदवाराला शेड्यूल्ड कमर्शिअल बँक किंवा रिजनल रुरल बँकेमध्ये कमीत कमी दोन वर्षांचा अनुभव असणारे अर्ज करु शकतात.

५) याशिवाय CIBIL किंवा इतर बाहेरच्या एजेन्सीमधील अहवालात डिफॉल्टर म्हणून घोषित केले असल्यास अशा उमेदवारांना अपात्र मानलं जाईल.


हेही वाचा – मुख्यमंत्र्यांनी थोडं फिरायलाही हवं – शरद पवार


 

First Published on: July 28, 2020 6:29 PM
Exit mobile version