मंदीत SBI मध्ये अधिकारी व्हायची सुवर्ण संधी; ९२ पदांसाठी होणार भरती

मंदीत SBI मध्ये अधिकारी व्हायची सुवर्ण संधी; ९२ पदांसाठी होणार भरती

देशात आधीच बेरोजगारीचं प्रमाण वाढलं असताना कोरोनाच्या संकटात हे प्रमाण खूपच वाढलं आहे. कोरोनाच्या संकटात आणि वाढत्या मंदीत बँकिंग क्षेत्रात काम करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. SBI मध्ये विविध अधिकारी पदासाठी ९२ जागा निघाल्या आहेत. SBI ने ९२ स्पेशलिस्ट केडर अधिकारी व इतर पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. इच्छूक उमेदवार १८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या दरम्यान नोंदणी करु शकतात. ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करु शकता.

पदासाठी अर्ज करताना एक व्यक्ती फक्त एका पदासाठीच अर्ज करु शकतो. सर्वसाधारण/ओबीसी/ईडब्ल्यूएस उमेदवारांना ७५० रुपयांचं शुल्क आहे तर अनुसूचित जाती/जमातीच्या उमेदवारांना कोणतीही फी नाही आहे. परीक्षा शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा ऑफलाीन पद्धतीनं भरावं लागेल.

कोणत्या पदांसाठी भरती?

१) उपव्यवस्थापक (डेटा सायंटिस्ट) – ११ पदे

शैक्षणिक पात्रता – आयटी / डेटा विज्ञान / मशीन लर्निंग आणि एआय मध्ये बी.टेक / एम टेक आणि 3 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

२) व्यवस्थापक (डेटा वैज्ञानिक) – ११ पदे
शैक्षणिक पात्रता – आयटी / डेटा विज्ञान / मशीन लर्निंग आणि एआय मध्ये बी.टेक / एम टेक, अनुभव ५ वर्षे.

३) उपव्यवस्थापक (सिस्टम अधिकारी) – ५ पदे
शैक्षणिक पात्रता – आयटी / डेटा विज्ञान / मशीन लर्निंग आणि एआय मध्ये बी.टेक / एम टेक

४) डेटा संरक्षण अधिकारी – १
पात्रता – १५ वर्षांच्या अनुभवासह बैचलर डिग्री

या पदांवरही संधी

रिस्क स्पेशियलिस्ट – १९ पदे,
पोर्टफोलियो मॅनेजमेंट स्पेशलिस्ट स्केल II – ३ पोस्ट
मॅनेजर (रिटेल प्रोडक्ट) – ५ पद
डिप्टी मॅनेजर (सिक्योरिटी) – २८ पद
असिसमेंट जनरल मॅनेजर – १ जागा
वरिष्ठ सलाहकार विश्लेषक – एक जागा
डेटा ट्रांसलेटर – एक जागा
डेटा ट्रेनर – एक जागा

अधिक माहितीसाठी आपण https://bank.sbi/careers या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

 

First Published on: September 21, 2020 6:57 PM
Exit mobile version