धक्कादायक : डिस्पोजेबल फेसमास्कमध्ये वैज्ञानिकांना आढळले ‘केमिकल पोल्यूटंट’

धक्कादायक : डिस्पोजेबल फेसमास्कमध्ये वैज्ञानिकांना आढळले ‘केमिकल पोल्यूटंट’

धक्कादायक : डिस्पोजेबल फेसमास्कमध्ये वैज्ञानिकांना आढळले 'केमिकल पोल्यूटंट'

वॉशिंग्टनमधील स्वानसी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी फेस मास्कमधील धोकादायक प्रदुषकांच्या कणांचा शोध लावला आहे. डिस्पोजल मास्क जेव्हा पाण्यात टाकले जातात त्यावेळी या मास्कवरील धोकादायक प्रदुषणाचे कण बाहेर पडतात. शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनामध्ये डिस्पोजल फेस मास्कमधून मोठ्या प्रमाणात धोकादायक प्रदुषकाचे कण,शीसे,तांबे,सिलिकॉन प्लास्टिकसारखे कण पाण्यावर निघाले होते. यामुळे महामारीत वापरण्यात येणाऱ्या फेस मास्कवर परिक्षण केले पाहिजे असे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.

महामारित वापरण्यात येणाऱ्या डिस्पोजेबलस फेस मास्कच्या सिलीकॉन, प्लास्टिक फाइबरमध्ये धोकादायक रासायनिक प्रदुषके शास्त्रज्ञांना सापडले आहेत. स्वानसी यूनिवर्सिटी कॉलेज ऑफ इजीनियरिंग चे प्रकल्पाचे मुख्य डॉ.सरपर सर्प यांनी माहिती दिली की, सध्याच्या कोविड-१९च्या महामारीत सगळ्यांना मास्क घालणे बंधनकारक आहे. परंतु आपल्याला फेस मास्क उत्पादनावर अधिक संशोधन आणि काही नियम लावण्याची आवश्यकता आहे. असे केल्यास आपण पुढे निर्माण होणाऱ्या धोक्याला टाळू शकतो. पर्यावरण आणि मानवी हानी होण्यापासून रोखू शकतो.

नुकत्याच केलेल्या फेस मास्कच्या संशोधनामध्ये जगात अनेक प्रकारचे मास्क वापरण्यात येत आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमादरम्यान बहुरंगी आणि अनेक प्रकारचे मास्क वापरण्यात येत आहे. युकेच्या रिटेल आउटलेटसमध्ये लहान मुलांचे अनेक प्रकारचे मास्क विक्री केले जात आहेत. कोरोना महामारीमध्ये एकदा वापरण्यात येणारे मास्क तसेच इतर कोविडसंदर्भातील कचऱ्यामुळे प्रदुषण वाढण्याचा धोका आहे. याबाबत अधिक संशोधन करण्यासाठी अधिक चाचण्या आणि परीक्षणे घेण्यात आली.

यामध्ये असे आढळले की, फेस मास्क पाण्यात सोडण्यात आले. या फेस मास्कमधून पर्यावरणास धोकादायक प्रुदषणाचे कण बाहेर पडले. संशोधकांनी असे म्हटले आहे की, या प्रदुषणाच्या कणांचा निसर्गावर विपरित परिणाम तसचे सार्वजनिक आरोग्याला याचा मोठा धोक आहे. कारण यामध्ये आढळणारे पदार्थ कर्करोग निर्मिती, कोशिकांचा मृत्यूला जबाबदार ठरू शकतात. यामुळे याचा सामना करण्यासाठी परीक्षण करण्याचा सल्ला संशोधकांनी दिला आहे.

डॉ. सर्पने पुढे म्हटले आहे की, नव्या SARS-COV-2 विषाणूच्या संसर्गाचा सामाना करण्यासाठी जागतिक पातळीवर लढा देण्यासाठी चीनमध्ये डिस्पोजेबल प्लास्टिक फेस मास्कचा दिवसाला २०० दशलक्ष पर्यंत निर्मिती पोहचली आहे. परंतु यामुळे येणाऱ्या काळात प्लास्टिकची वाढ होणार आहे. या मास्कचे अयोग्य नियमन न केल्याणे आणि त्याची विल्हेवाट लावणे ही एक प्लास्टिक प्रदुषणाची समस्या आहे. तसेच आपण प्लास्टिकच्या वाढत्या समस्येला पहिल्यापासून सामोरे जात आहोत.

दरम्यान असे बरेच पुरावे आहे की, जे सूचिकत करतात की आपण डीपीएफ कचऱ्यातील प्रदुषण पाण्यात टाकल्यावर बाहेर येऊन पर्यावरणाला हानी ठरु शकतात. संशोधनात आढळल्याप्रमाणे हे धोकादायक प्रदुषणे महामारीनंतर पर्यावरणातील प्रदुषणाचे मुख्य स्त्रोत बनतील. यामुळे पर्यावरणाती प्रदुषण कमी करण्यासाठी डीपीएफचे निर्माण आणि त्याची विल्हेवाट करण्यावेळी कडक निर्माण करण्यात यावेत.

अशा धोकादायक कणांचा आरोग्यावर होणारा विपरित परिणाम समजून घेण्याची गर आहे. यामधील मुख्य चिंता म्हणजे सहजपणे फेस मास्कमधील कण हे पाण्यात भिजल्यावर वेगळे होतात. म्हणूनच वातावरणात शिरणाऱ्या कणांचा तसेच श्वास घेतल्यानंतर हे काण शरीरात जातात का यावर संशोधन करण्यात यायला हवे. यामुळे हि एख चिंता आहे की, विशेषतः आरोग्य सेवा कर्मचारी, मुख्य कामगार किंवा मुलांना शाळेच्या दिवसात मास्क घालण्याची आवश्यकता आहे.

First Published on: May 5, 2021 6:57 PM
Exit mobile version