Coronavirus: पावसाळ्यात भारताला कोरोनाचा फटका बसू शकतो

Coronavirus: पावसाळ्यात भारताला कोरोनाचा फटका बसू शकतो

जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूला रोखण्यासाठी भारताने ४० दिवसांसाठी देश लॉकडाऊन केला आहे. जरी कोरोना आटोक्यात आला तरी येत्या पावसाळ्यात भारतीयांना कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा सामना करावा लागू शकतो. जुलैच्या उत्तरार्धात किंवा ऑगस्टमध्ये कोरोना विषाणूची लागण होणाऱ्यांच्या संख्येत अचानक वाढ होण्याची शक्यता वैज्ञानिकांनी वर्तवली आहे. लॉकडाऊन उठवल्यावर लोक सोशल डिस्टन्स कसा पाळतात यावर सर्व अवलंबून असणार आहे, असं वैज्ञानिकांनी म्हटलं आहे.

शिव नादर विद्यापीठाच्या गणित विभागातील प्राध्यापक समित भट्टाचार्य यांच्या म्हणण्यानुसार, नवीन प्रकरणांचा आलेख दररोज शिगेला पोहचत आहे आणि शेवटी तेो आलेख खाली येईल. मात्र, याला काही आठवडे किंवा महिने लागू शकतात. भट्टाचार्य पुढे म्हणाले, असं असलं तरी आपल्याला कोरोनाचा संसर्ग पुन्हा नव्याने सुरु होईल. पावसाळ्यात जुलैच्या अखेरीस किंवा ऑगस्टमध्ये महामारीची दुसरी फेरी परत येऊ शकते. तथापि या वेळी आपण सामाजिक अंतरवर कसं नियंत्रण ठेवतो यावर अवलंबून असेल.


हेही वाचा – लॉकडाऊनच्या काळात लोकसंख्या वाढीची चिंता; या राज्यात वाटले मोफत कंडोम


बंगळुरूमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) चे प्राध्यापक राजेश सुंदरसन देखील भट्टाचार्य यांच्या मताशी सहमत आहेत. राजेश यांच्या मते, एकदा सामान्य कामे सुरू झाल्यावर पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता वाढतील. प्रवासावरील काही निर्बंध कमी केल्यावर चीनने असा प्रभाव पाहिला आहे. आयआयएससी आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टीआयएफआर) च्या संशोधकांनी या साथीच्या आजारावर काम करणाऱ्या पेपरचे राजेश हे सहकारी लेखक देखील आहेत.

आयआयएससी आणि टीआयएफआरच्या संशोधकांनी या आठवड्यात जाहीर केलेला अभ्यास, लॉकडाऊन संपण्यावर काही निर्बंध कायम ठेवण्याची शिफारस करतो. शासनाने लागू केलेल्या संशयितांची चौकशी करणे, सामाजिक अंतरांचे पालन करणे यासारख्या धोरणांच्या परिणामांचा अभ्यासकांनी अभ्यास केल्यानंतर ही शिफारस केली आहे.

 

First Published on: April 25, 2020 12:46 PM
Exit mobile version