घरCORONA UPDATEलॉकडाऊनच्या काळात लोकसंख्या वाढीची चिंता; या राज्यात वाटले मोफत कंडोम

लॉकडाऊनच्या काळात लोकसंख्या वाढीची चिंता; या राज्यात वाटले मोफत कंडोम

Subscribe

सरकारला लोकसंख्या वाढीची चिंता सतावत आहे. लोकसंख्या वाढू नये म्हणून सरकारने खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बहुतांश देश लॉकडाऊन आहेत. भारतात देखील गेल्या ३ आठवड्यांपासून लॉकडाऊन सुरु आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देश लॉकडाऊन केल्यामुळे लोक घरीच आहेत. लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचं प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. तर दुसरीकडे सरकारला लोकसंख्या वाढीची चिंता सतावत आहे. लोकसंख्या वाढू नये म्हणून सरकारने खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशमधील बलिया येथे आरोग्य विभागाकडून घरोघरी जाऊन मोफत कंडोम वाटप करण्यात येत आहे.

लोकसंख्या वाढू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने घरोघरी मोफत कंडोम वाटण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन कंडोम, माला-डी और कॉपर टी अशा विविध किट्सचं मोफत वाटप करत आहे. लॉकडाऊनमुळे वाढणारी लोकसंख्या सरकारसाठी डोकेदुखी ठरणार आहे.त्यासाठी हे अभियान चालवलं जात आहे. प्रत्येक गावोगावी, शहरात आशासेविका लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी जात आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – …तर सॅनिटायझरचं इंजेक्शनच मारा; ट्रम्प यांचा डॉक्टरांना अजब सल्ला


कोरोना विषाणूमुळे घरात बंदिस्त असणाऱ्या जोडप्यांना लॉकडाऊनमुळे एकमेकांसोबत वेळ घालवायला वेळ मिळाला आहे. यामुळे सरकारच्या चिंता वाढल्या आहेत. लोकसंख्ये वाढू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने प्रत्येक घरात कुटुंब नियोजनाच्या किट्स वाटण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सहाय्यक मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वीरेंद्र प्रसाद यांनी दिली.

- Advertisement -

आतापर्यंत देशात कोरोनाग्रस्तांची संख्या २१ हजारांच्या वर गेली आहे. तर ७०० हून अधिक लोकांचा लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ३ मे पर्यंत देशव्यापी लॉकडाऊन असणार आहे. यामुळे लोकसंख्या वाढण्याची चिंता सरकारला सतावत आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -