भिकाऱ्याने Covid-19 फंडसाठी केले ९० हजार रुपये दान!

भिकाऱ्याने Covid-19 फंडसाठी केले ९० हजार रुपये दान!

भिकाऱ्याने Covid-19 फंडसाठी केले ९० हजार रुपये दान!

कोरोना महामारीने संपूर्ण जग हादरवून टाकले आहे. या गंभीर संकटात लोक ज्यांना जमेल तशी एकमेकांना मदत करताना दिसत आहेत. तामिळनाडूच्या मदुराई येथून एक बातमी समोर आली आहे जी लोकांना एक प्रेरणा नक्कीच देऊन जाईल. एका भिकारी पांडियन यांनी कोरोना राज्य मदत निधीमध्ये ९० हजार रुपये दान देऊन एक उत्तम उदाहरण जगासमोर मांडले आहे.  वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना पांडियन यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासनाने मला सामाजिक कार्यकर्त्याची पदवी दिली आहे, यामुळे मला खूप आनंद झाला. याआधीही मे महिन्यात त्यांनी जिल्हाधिकारी टी.जी. विनय यांना गरीब मुलांसाठी दहा हजार रुपयांची देणगी दिली होती असे सांगितले जात आहे.

तमिळनाडूच्या मदुराई येथील रहिवासी पांडियन खूप गरीब आहेत, लोकांकडे भिक मागून ते जगतात, परंतु कोरोनाच्या या संकटात त्यांनी आपल्या बचतीतून ९० हजार रुपये राज्याच्या कोविड -१९ मदत निधीमध्ये दान केले आहेत. सोशल मीडियावर, पांडियनचे या आश्चर्यकारक कार्याबद्दल कौतुक केले जात आहे.

पांडियन हे तुतीकोरिन जिल्ह्यातील आहे. ते गरिबीमुळे भीक मागू लागले. ते कधीही एकाच ठिकाणी वास्तव्यास राहत नसून भीक मागून पैसे गोळा करतात. पैसे जमा झाल्यास ते जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यास येतात. त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी शासकीय शाळांना अनेक वेळा देणगी दिली आहे. या जीवघेण्या कोरोनाने माणसांना कठीण परिस्थितीत जगण्याचा एक नवीन मार्ग शिकविला आहे. पांडियानसारखे लोक संपूर्ण समाजासाठी प्रेरणास्रोत बनले आहेत, जे फार कमी उत्पन्नामध्ये कोणतीही तक्रार न करता पूर्ण निष्ठेने समाजाची सेवा करताना दिसत आहेत.


तंत्रमंत्र करताना एकाचा मृत्यू, त्याला जिवंत करण्यासाठी दुसऱ्याची साधना

First Published on: August 19, 2020 5:52 PM
Exit mobile version