रेल्वेच्या टॉयलेटमध्ये आढळला अर्धनग्न अवस्थेत तरुणीचा मृतदेह

रेल्वेच्या टॉयलेटमध्ये आढळला अर्धनग्न अवस्थेत तरुणीचा मृतदेह

वसई रेल्वे स्थानकात कामगाराचा शॉक लागून मृत्यू

आसाममध्ये रेल्वेच्या टॉयलेटमध्ये एका विद्यार्थिनीचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह सापडला आहे. शिवसागर जिल्ह्यातील सिमलागुडी रेल्वे स्टेशनवर मंगळवारी एका रेल्वेमध्ये हा मृतदेह सापडला. आसाम कृषी विद्यापीठाची ही विद्यार्थिनी आहे. रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला अर्धनग्न अवस्थेत तिचा मृतदेह आढळला त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

बलात्कारानंतर हत्या केल्याचा संशय

शिवसागर रेल्वे स्थानकावर सकाळी साडेआठ वाजता या विद्यार्थीनीच्या आईने तिला रेल्वेमध्ये बसवले होते. जेव्हा ही रेल्वे सिमलागुडी रेल्वे स्थानकावर सव्वा नऊ वाजता पोहचली तेव्हा या मुलीचा मृतदेह रेल्वेच्या टॉयलेटमध्ये आढळला. पीडित मुलीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेमध्ये टॉयलेटमध्ये आढळली. चालत्या गाडीमध्ये या मुलीवर बलात्कार करुन त्यानंतर तिची हत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

१० हजार रुपयासाठी केली हत्या

पीडित मुलगी गोलाघाटमध्ये राहणाऱ्या नातेवाईकांच्या घरी जात होती. तिला फरकाटिंग रेल्वे स्टेशनवर उतरायचे होते. या स्थानकावर पोहचण्याआधीच तिची हत्या करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. मोबाईल फोन खरेदी करण्यासाठी तिला १० हजार रुपये दिले असल्याचे तिच्या आईने सांगितले. या पैशासाठीच तिची हत्या करुन मृतदेह टॉयलेटमध्ये फेकल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे.

पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु

या मुलीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेमध्ये आढळल्यामुळे तिच्यावर बलात्कार झाला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान जोपर्यंत पोस्टमॉर्टम रिपोर्ट येत नाही तोपर्यंत काहीही सांगणे कठीण असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.

First Published on: July 12, 2018 5:39 PM
Exit mobile version