काँग्रेसचे ज्येष्ठ नेता एम. व्ही. राजशेखरन यांचे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेता एम. व्ही. राजशेखरन यांचे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेता राजशेखरन

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेता एम. व्ही. राजशेखन यांनी ९१ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या राजशेखरन यांनी कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये एका खासगी हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. निधनानंतर त्यांच्या मागे पत्नी गिरिजा राजशेखरन, दोन मुलं आणि दोन मुली असा परिवार आहे. राजशेखरन यांचा जन्म १२ सप्टेंबर १९२८ रोजी रामगनर जिल्ह्यातील मारलावाडी येथे झाला होता.

कृषी आणि ग्रामीण विषयक अधिक माहिती असल्यामुळे त्यांना त्या विषयाचे सल्लागार म्हणूनही ओळखले जात होते. राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. युडियुरप्पा यांनी राजशेखरन यांनी श्रद्धांजली देताना भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, खासदार आणि केंद्रीय मंत्रीपद भुषवणारे ज्येष्ठ नेते राजशेखरन हे अतिशय साधेसरळ राहणीमान ठेवणारे, विनम्र आणि परिपक्व असे नेता होते.

हेही वाचा –

Coronavirus : १३ फुटांपर्यंत कोरोनाचा प्रसार होऊ शकतो – सीडीसीचा दावा

First Published on: April 13, 2020 10:36 AM
Exit mobile version