घरCORONA UPDATECoronavirus : १३ फुटांपर्यंत कोरोनाचा प्रसार होऊ शकतो - सीडीसीचा दावा

Coronavirus : १३ फुटांपर्यंत कोरोनाचा प्रसार होऊ शकतो – सीडीसीचा दावा

Subscribe

१३ फुटांपर्यंत कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ शकतो. तसेच चप्पल आणि बुटांमार्फतही कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका आहे, अशी माहिती अमेरिकन संस्था सीडीसीने दिली.

जगभरात कोरोना व्हायरसचा प्रसार झपाट्याने पसरत आहे. आतापर्यंत झालेल्या विविध संशोधनातून कोरोना विविध मार्गाने पसरत असल्याचे समोर आले आहे. परंतु अद्याप ही या व्हायरसवर कोणतेही औषध तयार करण्यात यश आलेले नाही. आता कोरोना बद्दल अजून एक माहिती समोर आली आहे की, १३ फुटांपर्यंत कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ शकतो. तसेच चप्पल आणि बुटांमार्फतही कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका आहे, अशी माहिती अमेरिकन संस्था सीडीसीने दिली.

अमेरिकन संस्था सीडीसीही विविध रोगांवर संशोधन करत असते. संस्थेने सांगितल्या प्रमाणे, १३ फुटांपर्यंत कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ शकतो. चीनमधील वूहान शहरातून कोरोना व्हायरसचा जन्म झाला. वूहान शहरातील मेडिकल स्टाफच्या बुटांमधील सोलचा अभ्यास करण्यात आला. त्यावेळी त्याच्या चप्पल आणि बुटांपासून कोरोना व्हायरसचा प्रसार हवेमध्ये होऊ शकतो, असेही समोर आले आहे.

- Advertisement -

सामाजिक अंतरामध्ये आपण २ मीटरपर्यंतचे अंतर पाळतो. त्यापेक्षा दुप्पट हा विषाणू प्रवास करतो. परंतु आता ४ मीटरच्या अंतरपर्यंत उभे राहण्याची गरज आहे. त्यामुळे हे संशोधन भारतासह सर्व जगासाठी महत्त्वाचे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -