वेळेच्या एक तास आधीच न्यायालयीन कामकाजाला सुरुवात, न्यायाधीशांसमोर ठेवला अनोखा आदर्श

वेळेच्या एक तास आधीच न्यायालयीन कामकाजाला सुरुवात, न्यायाधीशांसमोर ठेवला अनोखा आदर्श

सर्वोच्च न्यायालयाच्या( supreme court) कामकाजाला एक तास आधीच सुरुवात करून वरिष्ठ न्यायाधीश उदय ललित यांनी त्यांच्या वागणुकीतून इतर न्यायाधीशांसमोर आदर्श निर्माण केला आहे. वरिष्ठ न्यायाधीश उदय ललित(uday lalit) यांनी इतर न्यायाधीशांच्या कामकाजावर खरमरीत शब्दात टीका केली आहे. त्यावेळी ते म्हणाले की ”जर मुलं सकाळी ७ वाजत अशाळेत जाऊ शकतात, तर न्यायाधीश सकाळी ९ वाजता कामाला सुरुवात का करू शकत नाहीत?” कडक शब्दांत प्रश्न विचारला आहे.

हे ही वाचा – डिजिटल मीडियासाठी देशात येणार नवा कायदा, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून प्रक्रिया सुरू

वेळेच्या एक तास आधीच न्यायालयीन कामाला सुरुवात

सर्वोच्च न्ययालयाचे( supreme court) काम हे साधारतः सकाळी १०:३० वाजता सुरु होते. आणि सायंकाळी ४ वाजेपर्यंत संपते. त्याचबरोबर दुपारी १ ते २ अशी एका तासाची जेवणाची सुट्टीही न्यायाधिश घेतात. हे असे असतानाच मात्र न्यायाधीश उदय ललित(uday lalit) यांच्या अध्यक्षतेखाली कामं करत असलेल्या खंडपीठाने निहायमित कामाच्या वेळच्या एक तास आधीच म्हणजेच सकाळी ९:३० वाजता न्यायालयात दाखल होऊन सुनावणीला सुरुवात केली. उदय ललित यांच्या खंडपीठात न्यायमूर्ती एस रवींद्र भट यांच्यासमवेत न्यायमूर्ती सुधांशु धुलिया यांचाही समावेश होता. उदय ललित यांचा हा निर्णय नक्कीच कौतुकास्पद आहे. या निर्णयामुळे उदय ललित यांचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

हे ही वाचा – पती- पत्नीच्या नात्यात मंगळसूत्र ठरले घटस्फोटाचं कारण; मद्रास हायकोर्ट म्हणाले…

सकाळी ९ वाजत कामाला सुरवात करा

सर्वोच्च न्यायालयातील (supreme court) न्यायाधीशांनी सकाळी ९ वाजता न्यायालयीन कामकाजाला असुरुवात करा आणि त्या नंतर ११:३० वाजता म्हणजेच अडीज तासाने विश्रांती घेऊन १२ वाजता पुन्हा कामाला सुरुवात करा कानी दुपारी २ वाजता आपली कामे पूर्ण करा. म्हणजेच त्या नंतर मिळणाऱ्या वेळेचा सदुपयोग करून घेता येईल. या मिळालेल्या वेळेचा उपयोग सायंकाळी लांब पल्ल्याच्या सुनावणीसाठी अधिक वेळ मिळेल. असं मत वरिष्ठ न्यायाधीश उदय ललित यांनी व्यक्त केले.

हे ही वाचा – श्रीलंकेत आंदोलकांचा राष्ट्रपती भवनात धुडगूस, गोतबायांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

न्यायमूर्ती उदय ललित(uday lalit) हे पुढल्या महिन्यात म्हणजेच २७ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी विराजमान होणार आहेत. विद्यमान सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांच्याकडून उदय ललित पदभार स्वीकारतील. २७ ऑगस्ट ते ८ नोव्हेंबर पर्यंत सरन्यायाधीशपदाचा कार्यकाळ असेल. दरम्यान उदय ललित यांच्या निर्णयाचे सर्वच ठिकाणाहून विशेष कौतुक करण्यात येत आहे.

First Published on: July 15, 2022 8:03 PM
Exit mobile version