Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश श्रीलंकेत आंदोलकांचा राष्ट्रपती भवनात धुडगूस, गोतबायांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

श्रीलंकेत आंदोलकांचा राष्ट्रपती भवनात धुडगूस, गोतबायांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

Subscribe

श्रीलंका सरकारच्या विरोधातील जनतेच्या संतापाचा स्फोट झाला आहे. राष्ट्रपती गोतबाया राजपक्ष सरकारी निवासस्थान सोडून गेल्यावर तेथे आंदोलक घुसले असून त्यांनी निवासस्थानात धुडगूस घातला आहे.

श्रीलंका सरकारच्या विरोधातील जनतेच्या संतापाचा स्फोट झाला आहे. जनतेची साथ मिळाल्याने तेथील गोताबाया राजपशक्ष यांची राजवट उलथवण्यात विरोधखांना यश आले आहे. राष्ट्रपती गोतबाया राजपक्ष सरकारी निवासस्थान सोडून गेल्यावर तेथे आंदोलक घुसले असून त्यांनी निवासस्थानात धुडगूस घातला आहे.

- Advertisement -

श्रीलंकेच्या सध्याच्या परिस्थितीला गोतबाया राजपक्ष आणि त्यांचे कुटुंब जबाबदार आहे, अशी तिथल्या जनतेची भावना आहे. याआधीही सरकारच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरले होते. सरकारने आणीबाणी लादून हा रोष दाबून टाकला. मात्र, श्रीलंकेतील आर्थिक परिस्थितीत कुठलाही फरक पडला नव्हता. त्यामुळे जनतेचा रोष वाढत चालला होता. हे ओळखून विरोधकांनी गोतबायांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. लोकांची त्याला साथ मिळाल्यानंतर आज आंदोलकांनी थेट राष्ट्रपती भवनात धुडगूस घातला

जनतेच्या संतापाचा अंदाज आलेल्या गोतबाया यांनी वेळीच राष्ट्रपती भवन सोडले. त्यानंतर आंदोलकांनी राष्ट्रपती भवनाचा ताबा घेतला. सध्या हजारो आंदोलक राष्ट्रपती भवनात आहेत. काही जण तेथील स्वीमिंग पूलमध्ये पोहण्याचा आनंद लुटत आहेत. गोतबाया यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे.

- Advertisement -

 

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -