फुटीरतावादी नेता यासिन मलिक पुन्हा एकदा जेल बंद

फुटीरतावादी नेता यासिन मलिक पुन्हा एकदा जेल बंद

फुटीरतावादी नेता यासिन मलिक पुन्हा एकदा जेल बंद

राष्ट्रीय तपास संस्थाने जम्मू-कश्मीर येथील दहशतवाद्यांना कारवाई करण्यासाठी आर्थिक मदत पुरविल्या प्रकरणी जम्मु-काश्मीर मधील फुटीरतावादी नेता यासिन मलिक याला पुन्हा एकदा आज, बुधवार दि. १० एप्रिलला अटक केली आहे. यासिनला मंगळवार दि. ९ एप्रिला दिल्लीमध्ये आणण्यात आले होते. जम्मू आणि काश्मीरच्या लिबरेशन फ्रंटचा नेता यासिन मलिकला पोलिस संरक्षणात तिहार जेलमध्ये नेण्यात आले होते. या आधीही फेब्रुवारीमध्ये यासिनला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तसेच जम्मू येथील जेलमध्ये ठेवण्यात आले होते.

Kashmiri Separatist leader Yasin Malik formally arrested by NIA in courtroom in connection with 2017 terror financing and terror conspiracy case. Court sends him on NIA remand till 22nd April. (File pic) pic.twitter.com/qnDpQyRaIz

— ANI (@ANI) April 10, 2019

दिल्लीमध्ये आणण्यात आले

यासिन मलिकच्या जम्मू आणि काश्मीर लिबरेशन फ्रंटवर गेल्यावेळीच मोदी सरकारने मोठी करावाई केली होती. त्याच्यावर केंद्राकडून बंदी घालण्यात आली होती. मलिक याच्यावर सीबीआयने दोन खटले दाखल केले आहेत. तर एनआयएच्या विशेष न्यायालयाने मलिकच्या चौकशीसाठी परवानगी दिली त्यानंतर त्याला दिल्लीत आणण्यात आले आहे. गेल्यावेळी मलिक जम्मू येथील कोट बलवाल तुरूंगात होता, तर आता त्याचा ताबा घेत एमआयएने मलिकला अटक केली आहे.

अनेक गुन्हे दाखल

आतापर्यंत यासिन मलिक विरूद्ध ३७ एफआयआर दाखल झाले आहेत. त्यामध्ये दोन वायुसेनेच्या कार्यकर्तंची हत्या, तसेच सीबीयाने दोन एफआयआर दाखल केले आहेत. तर राष्ट्रीय तपास संस्थेने पण तक्रार दाखल केले आहेत. जम्मू आणि काश्मीर, पुलवामामध्ये १४ फेब्रुवारीला दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर तिथल्या सरकारने जम्मू-काश्मीर मधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढुन घेतली होती. त्यामध्ये यासिन मलिक, सैय्यद अली शाह गिलानी, शब्बीर शाह आणि सलीम गिलानी यांचा समावेश होता.

First Published on: April 10, 2019 3:15 PM
Exit mobile version