sero survey: पंजाबमध्ये ५८% मुलांमध्ये Covid-19 विरोधात लढण्यासाठी Antibody

sero survey: पंजाबमध्ये ५८% मुलांमध्ये Covid-19  विरोधात लढण्यासाठी Antibody

sero survey: पंजाबमध्ये ५८% मुलांमध्ये Covid-19 विरोधात लढण्यासाठी Antibody

देशात अनेक ठिकाणी लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंजाबमध्ये ५८ टक्के लहान मुलांमध्ये कोविड विरोधात लढण्यासाठी अँटिबॉडीज (Antibodies)  आढळून आल्या आहेत. (sero survey: Antibody to fight Covid-19 in 58% of children in Punjab)
आरोग्य विभागाद्वारे गेल्या आठवड्यात करण्यात आलेल्या बाल चिकित्सा सेरो सर्वेक्षणात हे समोर आले आहे. पंजाबमध्ये ६ ते १७ वर्षांमधील जवळपास ५८ टक्के मुलांमध्ये कोरोना विरोधी अँटिबॉडीज निर्माण झाल्या आहेत. कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे सांगण्यात आले आहे त्याच पार्श्वभूमीवर लहान मुलांमध्ये आढलेल्या अँटिबॉडीज ही सकारात्मक बाजू आहे.

 

 

सेरो सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, १,५७७ मुलांमधून ८९७ मुलांमध्ये अँटिबॉडीज विकसित झाल्यात. प्रत्येक जिल्ह्यातून जवळपास ९२ रक्ताचे सॅम्पल्स घेण्यात आले होते. त्यातील ४६ सॅम्पल्स हे ग्रामीण क्षेत्रातून घेण्यात आले होते.

 

सेरो सर्वेक्षणात पटियाला जिल्ह्यात १६ टक्के मुलांमध्ये अँटिबॉडीज आढळून आल्या. तर मोगा जिल्ह्यात जवळपास ८२ टक्के मुलांमध्ये कोरोना विरोधी अँटिबॉडीज आढळून आल्या. आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सुरुवातीचे आकडे आहेत. काही दिवसात याचा अंतिम निकाल सादर करण्यात येणार आहे. नोडल अधिकारी डॉ. राजेश भास्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेची खबरदारी म्हणून जिल्ह्यात बाल चिकित्स वॉर्ड आणि खाटांच्या संख्येत वाढ करण्याचे निर्देश दिले आहेत.

 

पंजाब राज्यातील ५८ टक्के मुलांमध्ये अँटिबॉडीज आढळून आल्यात ही चांगली बाब आहे. यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटे विरोधी लढण्यासाठी मोठी मदत होणार आहे. अशा प्रकारे राज्यातील सर्व जिल्ह्यांचे सर्वेक्षण करुन कोरोनाच्या तिसऱ्या लाटे विरोधी लढण्यासाठी रणनीती तयार करता येईल, असे पंजाबचे आरोग्य विभागाचे डॉ. जीबी सिंह यांनी म्हटले आहे.


हेही वाचा – Covid-19: बंगळूरुमध्ये एका आठवड्यात ३०० विद्यार्थी पॉझिटिव्ह, ‘या’ राज्यातील शाळांमध्येही वाढतोय कोरोनाचा धोका

First Published on: August 12, 2021 4:11 PM
Exit mobile version