सीरम इंस्टीट्यूटकडून ‘Covishield’ नंतर आणखी एका लसीच्या निर्मितीला सुरूवात

सीरम इंस्टीट्यूटकडून ‘Covishield’ नंतर आणखी एका लसीच्या निर्मितीला सुरूवात

Corona Vaccine :

लवकरच भारताला आणखी एक कोरोना लस मिळण्याची शक्यता आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने अमेरिकन कंपनी नोव्हाव्हॅक्सच्या सहकार्याने भारतात आणखी एक लस तयार करण्यास सुरूवात केली आहे. कोव्होव्हॅक्स (Covovax) या नावाने ही लस भारतात लाँच करण्यात येणार आहे. सीरम संस्थेचे सीईओ अदार पूनावाला यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. कोव्होवॅक्स क्लिनिकल चाचण्यांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक प्रभावी असल्याचे समोर आले आहे. या आठवड्यात कोरोना लसीच्या कोव्होवॅक्सच्या पहिल्या बॅचचे उत्पादन सुरू करण्यात आले आहे, असे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने सांगितले आहे. तसेच दिग्गज फार्मास्युटिकल कंपनीने एक निवेदन जारी केले आहे की, या आठवड्यात नोव्हाव्हॅक्सने तयार केलेल्या कोरोना लसची पहिली बॅच बनविणे सुरू केले आहे, ज्याला भारतात कोव्होवॅक्स असे नाव देण्यात आले आहे.

कोव्होवॅक्सची पहिली बॅच आमच्या पुणे येथे तयार केली जात आहे हे पाहून खूप आनंद होतोय. १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या भावी पिढीचे संरक्षण करण्याची क्षमता या लसीमध्ये आहे. लसीचं ट्रायल अद्याप सुरू आहे. वेल डन टीम सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ असं ट्विट करत अदार पुनावाला यांनी आपल्या टीमचं कौतुक केलं आहे. या लसीचे ‘ब्रिजिंग ट्रायल’ही अंतिम टप्प्यात आहे. याचाच अर्थ देशाला लवकरच आणखी एक कोरोना लस मिळणार आहे. येत्या महिन्यात देशभरात मुलांवरदेखील ‘कोवोवॅक्स’ या लसीच्या क्लिनिकल ट्रायल सुरुवात होणार आहे.

दरम्यान,सप्टेंबर २०२० मध्ये नोव्हाव्हॅक्सने सीरम संस्थेबरोबर NVX-CoV2373 या लसीसाठी उत्पादन कराराची घोषणा केली. नोव्हाव्हॅक्स १४ जून रोजी दिलेल्या निवेदनात म्हणाले की, कोविड संसर्गाच्या मध्यम आणि गंभीर प्रकरणांमध्ये NVX-CoV2373 लसीमध्ये १००% संरक्षण दिसून आले. या लसीचा एकूण कार्यक्षमता दर ९०.४ टक्के असल्याची माहिती कंपनीने दिली होती. यासह जानेवारी महिन्यापासून सीरम इन्स्टिट्यूटकडून अॅस्ट्रेजेनेका आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या ‘कोव्हिशिल्ड’ या करोना लसीची निर्मिती सुरू आहे. याशिवाय ‘भारत बायोटेक’ची ‘कोव्हॅक्सिन’ आणि रशियाची ‘स्पुतनिक व्ही’ या लशींचाही करोना लसीकरण मोहिमेत मोलाचा वाटा आहे.


Cowin.gov.in पोर्टलवर Covid-19 सर्टिफिकेटसह पासपोर्ट लिंक करायचंय? जाणून घ्या प्रक्रिया

 

 

First Published on: June 25, 2021 8:29 PM
Exit mobile version