घरट्रेंडिंगCowin.gov.in पोर्टलवर Covid-19 सर्टिफिकेटसह पासपोर्ट लिंक करायचंय? जाणून घ्या प्रक्रिया

Cowin.gov.in पोर्टलवर Covid-19 सर्टिफिकेटसह पासपोर्ट लिंक करायचंय? जाणून घ्या प्रक्रिया

Subscribe

देशात कोरोनाची दुसरी लाट सुरू असून यादरम्यान कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी कोविन पोर्टलवर नोंदणी करून कोट्यवधी लोकांना आतापर्यंत लस देण्यात आली आहे. सध्या कोरोनाची ही दुसरी लाटही कमी होत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी झाला तर लवकरच आंतरराष्ट्रीय प्रवास देखील करता येणार आहे. परंतु त्याआधी परदेशात जाणाऱ्या लोकांना त्यांच्या पासपोर्टसह कोव्हिड लसीकरण सर्टीफिकेटसह अपडेट करावी लागणार आहे. आरोग्य सेतूच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ही माहिती कशी अपडेट केली जाईल याबद्दल ट्विट केले गेले आहे. या ट्विटमध्ये पासपोर्टशी संबंधित माहिती अपडेट कशी करावी हे सांगण्यात आले आहे. परंतु त्याआधी, या महिन्याच्या सुरूवातीला कोविड 19 लसीकरणासंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली होती.

या नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये असे सांगण्यात आले होते की, शिक्षण, रोजगार आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्यांना कोविड च्या 19 लसीकरणाचे सर्टिफिकेट त्यांच्या पासपोर्टसह लिंक करावे लागणार आहे. या निर्णयाअंतर्गत सरकारने कोविन पोर्टलवर पासपोर्टची माहिती अपडेट करण्यास सांगितले आहे. पासपोर्टचा तपशील भरताना कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

- Advertisement -

असं करा Covid-19 सर्टिफिकेटसह पासपोर्ट लिंक

  • पासपोर्टला कोव्हिन सर्टिफिकेटशी लिंक करण्यासाठी, सर्वप्रथम, तुमच्या फोनवर किंवा लॅपटॉपवर ब्राउझर ओपन करा.
  • Cowin.gov.in वर जा आणि एकदा तुमच्या नोंदणीकृत क्रमांकासह लॉगिन करा.
  • ‘Raise a Issue’ वर क्लिक करा, हा पर्याय लस घेतल्यानंतर तुम्हाला दिसेल.
  • त्यानंतर पासपोर्टचा पर्याय निवडा आणि काळजीपूर्वक तुमची माहिती भरा.
  • यानंतर तुम्हाला पासपोर्टची माहिती भरावी लागेल, माहिती भरताना काळजी घ्या.
  • यावेळी रिक्व्हेस्ट सबमिट केल्यानंतर पुन्हा माहिती बदलता येणार नाही, याची काळजी घ्या.
  • सबमिट पर्याय दाबल्यानंतर, काही काळानंतर नवीन सर्टिफिकेट डाउनलोड करण्याचा पर्याय येईल.

कोविड लसीकरण सर्टिफिकेटमध्ये काही चूक असल्यास, प्रथम ती माहिती दुरुस्त करा, तरच कोविड सर्टिफिकेट आपल्या पासपोर्टसह लिंक करा. या नोंदणीसाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकासह cowin.gov.in वर लॉगिन करा. राइज एन इश्यूवर क्लिक करा आणि सर्टिफिकेट पर्यायावर जा. यानंतर जे बदल करायचे ते करा, त्यानंतर योग्य माहिती प्रविष्ट करा आणि सबमिट करा.

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -