Omicronसोबत लढण्यासाठी SII बनवला कोविशिल्डचा बूस्टर डोस; DCGIकडे मंजूरीसाठी केली मागणी

Omicronसोबत लढण्यासाठी SII बनवला कोविशिल्डचा बूस्टर डोस; DCGIकडे मंजूरीसाठी केली मागणी

Omicronसोबत लढण्यासाठी SII बनवला कोविशिल्डचा बूस्टर डोस; DCGIकडे मंजूरीसाठी केली मागणी

जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण करणारा कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनसोबत लढण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (Serum Institute of India) तयार सुरू केली आहे. सीरम इन्स्टिट्यूटने कोविशिल्डचा बूस्टर डोस विकसित करून ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (DCGI) या बूस्टर डोसला मंजूरी देण्याची मागणी केली आहे. याबाबतची माहिती स्वतः सीरम इन्स्टिट्यूटने दिली आहे.

DCGIला पाठवलेल्या पत्रात काय म्हटले सीरमने? 

सीरम इन्स्टिट्यूटचे सरकारी आणि नियामक व्यवहार संचालक प्रकाश कुमार सिंह यांनी सांगितले की, ‘कोविशिल्डच्या बूस्टर डोसला मान्यता मिळण्यासाठी डीसीजीआयकडे पत्र पाठवले आहे. यूके मेडिसिन अँड हेल्थकेअर प्रोडक्ट्स रेग्युलेटरी एजेंसीने एस्ट्राजेनिकाच्या बूस्टर डोस याआधीच मंजूरी दिली आहे.’ दरम्यान डीसीजीआयकडे पाठवण्यात आलेल्या पत्रात सीरमने असे म्हटले आहे की, दुसऱ्या देशांप्रमाणे भारतातील बऱ्याच लोकांनी कोविशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतले आहे. असे लोकं सतत बूस्टर डोस देण्याची विनंती करत आहेत.

लवकरात लवकर द्यावी बूस्टर डोसला मंजूरी – प्रकाश सिंह 

पुढे प्रकाश सिंह यांनी सांगितले की, ‘जग सातत्याने कोरोना महामारीशी लढत आहे. अशात काही देशांनी कोरोनासोबत लढण्यासाठी बूस्टर डोस देण्यास सुरुवात केली आहे. आता देशात कोविशिल्ड लसीचे कोणतीही कमी नाही. म्हणून लसीचे दोन डोस घेतलेले लोकं नव्या व्हेरियंटच्या अनुषंगाने बूस्टर डोस देण्याची मागणी सातत्याने करत आहेत. त्यामुळे बूस्टर डोस देण्याची मंजूरी लवकरात लवकर द्यावी.’


हेही वाचा – Omicron Variant: ओमिक्रॉनचा प्रसार भारतातही…, ICMRचे तज्ज्ञ डॉ. पांडांचं मोठं विधान


 

First Published on: December 2, 2021 11:13 AM
Exit mobile version