शारजाह टॉवरला भीषण आग; ७ जण जखमी, २५०हून अधिक कुटुंबियांना काढले बाहेर

शारजाह टॉवरला भीषण आग; ७ जण जखमी, २५०हून अधिक कुटुंबियांना काढले बाहेर

शारजाह टॉवरला भीषण आग

संयुक्त अरब अमिरातीच्या शारजाह येथील एका निवासी टोलेजंग टॉवरला मंगळवारी रात्री उशिरा भीषण आग लागली होती. ही घटना अल नहदा भागात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या सर्व रहिवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले असून बचावकार्य अद्याप सुरू आहे.

२५०हून अधिक कुटुंबियांना सुखरूप बाहेर काढले

खलिज टाईम्सच्या वृत्तानुसार, या इमारतीत लागलेल्या भीषण आगीत सात जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर घटनास्थळी उपचार सुरू आहेत तर पाच जणांचा आगीमुळे जीव गुदमरल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मंगळवारी रात्री साधारण ९ वाजेच्या सुमारास ही आग लागल्याचे शारजाह सिव्हिल डिफेन्सचे डायरेक्टर जनरल कर्नल सामी अल नकबी यांनी खलिज टाईम्सला सांगितले.

तर ताज बंगळूरू रेस्टॉरंटच्या शेजारी असलेल्या इमारतीत ही आग भडकली असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. जोरदार वाऱ्यामुळे पसरलेल्या आगीत या भागात पार्क केलेल्या अनेक मोटारींचेही नुकसान झाले असून २००६ मध्ये बांधलेल्या या इमारतीतून २५० हून अधिक कुटुंबियांना बाहेर काढण्यात आले.

गल्फ न्यूजच्या वृत्तानुसार, अल नहदा परिसरातील ऐब्को टॉवर इमारतीत ही भीषण आग लागली असून त्यात पार्किंग व्यतिरिक्त ४७ मजले आहेत. घटना समजताच अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली तेथील परिस्थिती नियंत्रणात आणली. आग विझविण्याचे काम अद्याप सुरू असून येथे आग कशामुळे लागली, हे कळू शकले नाही.


‘नमस्ते ट्रम्प’ मुळे गुजरातमध्ये झाला कोरोनाचा फैलाव, काँग्रेसचा आरोप!
First Published on: May 6, 2020 10:20 PM
Exit mobile version