घरदेश-विदेश'नमस्ते ट्रम्प' मुळे गुजरातमध्ये झाला कोरोनाचा फैलाव, काँग्रेसचा आरोप!

‘नमस्ते ट्रम्प’ मुळे गुजरातमध्ये झाला कोरोनाचा फैलाव, काँग्रेसचा आरोप!

Subscribe

गुजरातमधील कोरोनाच्या वाढत्या प्रकरणानंतर कॉंग्रेसने २४ फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथे झालेल्या 'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रमासंदर्भात विजय रुपाणी सरकारवर चांगलाच निशाणा साधला

देशात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असून गुजरात या राज्यांपैकी एक आहे ज्यात कोरोनाचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. दरम्यान, गुजरातमध्येही कोरोनाबाबत राजकारण करण्यास देखील सुरू झाले आहे. ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमामुळे गुजरातमध्ये कोरोना पसरण्यास सुरुवात झाली आणि या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, असा आरोप कॉंग्रेसकडून करण्यात आला आहे.

गुजरातमधील कोरोनाच्या वाढत्या प्रकरणानंतर कॉंग्रेसने २४ फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथे झालेल्या ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमासंदर्भात विजय रुपाणी सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे. यावेळी ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमामुळे राज्यात कोरोनाचा वेगाने फैलाव होऊ लागला आहे, असा आरोप गुजरात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित चावरा यांनी केला आहे.

- Advertisement -

न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी

गुजरात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित चावरा यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करत असे म्हटले की ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमासंदर्भात गुजरात उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला जाईल. या याचिकेत या कार्यक्रमाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

तर खबरदारीचा उपाय का घेतला नाही?

तसेच, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अभिवादन समिती आणि गुजरात क्रिकेट असोसिएशन विरूद्ध चौकशी करण्यात येईल. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून भारत सरकारला कोरोनाचे गांभीर्य माहित असतानाही कोणताही खबरदारीचा उपाय का घेतला नाही?, असेही अमित चावरा म्हणाले.

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजपा सरकारवर हल्लाबोल करताना अमित चावरा म्हणाले की, जागतिक आरोग्य संघटनेने आधीच हा इशारा दिला होता की हा रोग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत आहे, असे असताना देखील सरकारने या आजाराच्या गांभीर्याकडे दुर्लक्ष करून राजकीय फायद्यासाठी ‘नमस्ते ट्रम्प’ हा कार्यक्रम आयोजित केला. तसेच, ‘नमस्ते ट्रम्प’ हा कार्यक्रम जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करून अनवधानाने केलेली चूक नाही, तर गुन्हा आहे.


CoronaVirus: कोरोनाचा अफगाणिस्तानावर होणार सर्वाधिक परिणाम!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -