सर्वात आधी Vaccination होऊनही ‘या’ देशात कोरोनाचा धोका, भारतासाठी चिंतेची बाब

सर्वात आधी Vaccination होऊनही ‘या’ देशात कोरोनाचा धोका, भारतासाठी चिंतेची बाब

सर्वात आधी Vaccination होऊनही 'या' देशात कोरोनाचा धोका, भारतासाठी चिंतेची बाब

देशभरात कोरोनाचा धुमाकूळ सुरु आहे. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी त्यावर प्रतिबंधात्मक लस तयार करण्यात आली. अनेक देशात कोरोना लसीकरण सुरु झाले आहे. तर काही देशात लसीकरण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी सध्या कोरोना लस घेणे हा एकच महत्त्वाचा उपाय आहे. मात्र लस घेऊनही आफ्रिकेतील देशात कोरोना संक्रमणाचा धोका वाढत आहे. आफ्रिकी देश सेशेल्समध्ये सर्वांधिक लसीकरण प्रक्रिया पार पडली होती मात्र सेशेल्समध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. जगभरात सर्वांत आधी सेशेल्समध्ये लसीकरण करण्यात आले होते. सेशेल्सच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ७ मे पासून सेशेल्समध्ये सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे. मे महिन्यात नव्या बाधित रुग्णांची संख्या २ हजार ४८६ इतकी नोंदवण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात लसीकरण करुनही बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे भारतासाठी ही चिंतेची बाब आहे. कसे ते जाणून घ्या.

सेशेल्समध्ये अधिकत लोकांचे जीवन हे पर्यटन व्यवसायावर चालते. सेशेल्स हा लवकरात लवकर पर्यटनासाठी खुला करण्यात यावा यासाठी लसीकरणाला सर्वांत जास्त सर्वात जास्त प्राधान्य देण्यात आले. सेशेल्समध्ये ५७ टक्के लोकांना चीनची सिनोफार्म आणि इतर लोकांना भारत ऑक्सफर्डची कोविशिल्ड लस देण्यात आली होती. भारतातही कोविशिल्ड लस मोठ्या प्रमाणात देण्यात येत आहे. त्यामुळे भारतात ही चिंतेची बाब ठरत आहे. मात्र सेशेल्स न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यत लस घेतलेल्या कोणत्याही संक्रमित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

दहा लाखांहून कमी लोकसंख्या असलेल्या सेशेल्समध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात आले. मात्र कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागल्याने सेशेल्समध्ये गेल्य आठवड्यापासून शाळा बंद करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे खेळांचे केलेले आयोजनही रद्द करण्यात आले आहे. लोकांच्या भेटण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.

लसीकरण होऊनही रुग्ण वाढल्याने WHOनेही चिंता व्यक्त केली आहे. मात्र कोणत्याही निष्कर्षांविना लस काम करत नाहीअसे म्हणता येणार नाही. सेशेल्समध्ये वाढणाऱ्या रुग्णसंख्येचे मूल्यांकन केले जात आहे ,असे WHOने म्हटले आहे. WHOच्या म्हणण्यानुसार, ज्यांनी लस घेतली नाहीय त्यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका संभवतो आहे. ज्या लोकांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत. त्यांच्यापैकी कोणाचाही आतापर्यंत मृत्यू झालेला नाही. लस न घेतल्यामुळे लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. केवळ लस घेऊन काहीच होणार नाही. कोरोनापासून वाचण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, हात धुणे आणि मास्क घालणे गरजेचे आहे, असेWHOने म्हटले आहे.


हेही वाचा – अमेरिकेत वर्षभरापासून शेकडो कोरोना मृतदेह ट्रक मधे पडून, अंत्यविधीचे Waiting संपेना

First Published on: May 12, 2021 5:06 PM
Exit mobile version