जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी दिला राजीनामा

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी दिला राजीनामा

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी पदाचा राजीनामा दिला असून प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचे सांगितले जात आहे. शिंजो आबे हे प्रकृती अस्वास्थामुळे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. गेल्या काही महिन्यांत त्यांना अनेकदा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यामुळे आबे यांनी पदाचा राजीनामा देत असल्याचे आज जाहीर केले.

पत्रकार परिषदेत बोलताना आबे म्हणाले की, मी पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. आबे हे अल्सरेटिव कोलाइटिस या आजारावर उपचार घेत असून त्यांनी सांगितले की, नवीन उपचार घेत आहे. त्यानुसार, नियमितपणे आरोग्य तपासणी आणि देखभालीची आवश्यकता आहे. उपचारांमुळे मी पंतप्रधान म्हणून कर्तव्य पूर्णपणे पूर्ण करू शकत नाही. लोकांनी बहुमत देऊन पुन्हा विश्वास दर्शवला होता. मात्र, पूर्ण क्षमतेनुसार आपण काम करू शकत नाही. लवकरच सत्ताधारी लिबरल डेमोक्रेटीक पार्टी नव्या पंतप्रधानाची निवड करणार आहे.

हेही वाचा –

सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल; UGC च्या परीक्षा होणारच

First Published on: August 28, 2020 4:33 PM
Exit mobile version