‘भारताने आमच्यासाठी व्हेंटिलेटर बनवल्यास पाकिस्तान हे ऋण कधीही विसरणार नाही’

‘भारताने आमच्यासाठी व्हेंटिलेटर बनवल्यास पाकिस्तान हे ऋण कधीही विसरणार नाही’

शोएब अख्तर

कोविड-१९ चा प्रादुर्भाव संपूर्ण जगात पसरला आहे. भारताच्या शेजारील देश पाकिस्तानही त्यापासून काही वेगळा नाही. पाकिस्तानमध्येही कोरोनाची हजारो नागरिकांना लागण झाली असून तेथील प्रशासनदेखील त्रस्त झाले आहेत. जगावर कोरोनाचे संकट ओढवले असताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याने भारत – पाकिस्तान सामन्याचा प्रस्ताव मांडला आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये वनडे इंटरनॅशनल सीरीज खेळवली जावी आणि त्यातून जी रक्कम जमा होईल ती दोन्ही देशांतील लोकांच्या मदतीसाठी वापरण्यात यावी, असा प्रस्ताव शोएब अख्तर यांनी मांडला आहे. तसेच भारताने जर आमच्यासाठी १० हजार व्हेंटिलेटर्स बनवले तर पाकिस्तान कायम त्यांचे ऋणी राहील, असेदेखील शोएबने म्हटले आहे. अर्थात हा एक प्रस्ताव असून याचा विचार दोन्ही देशातील संबंधीत अधिकाऱ्यांनी करावा, असे त्याने पुढे नमूद केले.

हेही वाचा – दिल्लीत कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर हल्ला

दोन्ही देशांतील सामन्याचा फायदा होईल 

भारत – पाकिस्तान सामना हा संपूर्ण जगासाठी नेहमीच चर्चेचा विषया राहिला आहे. दोन्ही देशांमधील शत्रूत्व हे काही लपून राहिलेले नाही. त्यातही दोन्ही देशांमधील खेळाडू एकमेकांसमोर आल्यास किती जिद्दीने खेळतात हेदेखील सर्वांनी पाहिले आहे. यापूर्वी भारत-पाकमध्ये २०१२-१३ साली शेवटची वनडे इंटरनॅशनल सीरीज झाली होती. त्यानंतर फक्त आयसीसी आणि एशिया कपमध्ये दे दोन्ही टीम एकमेकांच्या विरोधात खेळले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा भारत-पाक सामना व्हावा, असे शोएबला वाटत आहे. याबाबत शोएब अख्तर म्हणाले की, ‘या कठिणप्रसंगी दोन्ही देशांतील लोकांनी एकत्र यायला हव’. त्यामुळे या सीरीजचा विचार करत आहे. भारत-पाकमध्ये तीन सामने खेळले जावे, असं पहिल्यांदाच घडेल जेव्हा दोन्ही देशातील नागरिक या सामन्यांकडे बघून वाईट वाटून घेणार नाहीत. कारण हा सामना चांगल्या उद्दिष्टाने खेळला जाईल. जर विराट कोहलीने शतक केले, तर आम्ही आनंदी होऊ आणि जर बाबर आजमने शतक केले तर भारतीय खुश होतील. या सामन्याच्या अंती कोणीही जिंकल तर मैदानाबाहेर दोन्ही टीम विजेता असेल.

हेही वाचा – औषध पुरवठा करण्याच्या निर्णयावर ट्रम्प खूश; मानले पंतप्रधानांचे आभार

दुबईत ठेवा सामना

सध्या जगभरात तणावाचे वातावरण आहे. कोणीही घराबाहेर पडू शकत नाही. मात्र जेव्हा परिस्थिती पूर्ववत होईल तेव्हा हे सामने दुबईत ठेवले जावे. दोन्ही देशातील खेळाडूंसाठी चार्टर्ड प्लेनची व्यवस्था करण्यात यावी, असेही शोएब यांनी म्हटले आहे.

First Published on: April 9, 2020 8:50 AM
Exit mobile version