शोभा डेंचे पुन्हा वादग्रस्त ट्विट, राज्यपालांचा ‘चमचा’ असा उल्लेख

शोभा डेंचे पुन्हा वादग्रस्त ट्विट, राज्यपालांचा ‘चमचा’ असा उल्लेख

शोभा डे

शोभा डे यांची ट्विटरवरील टिवटिवाट् सगळ्यांच्याच परिचयाची आहे. एखाद्याला सोशल मीडियातून टार्गेट करायची त्यांची सवय काही नवीन नाही. आता चक्क त्यांनी त्यांच्या ट्विटमधून कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांना टार्गेट केले आहे. राज्यपालांचा उल्लेख शोभा डे यांनी ट्विटमध्ये ‘चमचा’ असा केला असून, त्यांच्या या ट्विटमुळे नवा वाद उदभवण्याची शक्यता आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. मात्र, एकहाती सत्ता कोणत्याच पक्षाला न मिळाल्यामुळे आता सत्तेच्या गादीवर कोण बसणार हा ? हा तिढा कायम आहे. अशातच लेखिका शोभा डे यांनी ट्विटरवरुन थेट तेथील राज्यपालांना लक्ष्य केले. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘ ही लोकशाही आहे का? इतका मोठा निर्णय चमचा असलेल्या राज्यपालाच्या हाती देणं योग्य आहे का?’

२००१ साली नरेंद्र मोदींसाठी कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होतो. त्यामुळे जो राज्यपाल आपल्या आमदारकीची जागा अन्य व्यक्तीसाठी सोडू शकतो. तो इतका मोठा निर्णय घेऊ शकत नाही, असे शोभा डेना या ट्विटमधून सूचित करायचे असावे, असा तर्क लढविण्यात येत आहे.

First Published on: May 16, 2018 8:00 AM
Exit mobile version