Shopian encounter: भारतीय सरपंचाला मारणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा; ४ अतिरेकी ठार

Shopian encounter: भारतीय सरपंचाला मारणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा; ४ अतिरेकी ठार

शोपियां येथील चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा

सुरक्षा दल आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत काश्मिरच्या शोपियान जिल्ह्यात चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळाले आहे. चारपैकी दोन दहशतवाद्यांनी काही दिवसांपूर्वी सुहैल भट या सरपंचाचे अपहरण करुन त्याची हत्या केली होती. आज चारही दहशतवाद्यांचा खात्मा झाल्यामुळे एका अर्थाने सुहैल भट यांना न्याय मिळाला आहे. तर चकमकीनंतर एका दहशतवाद्याने आत्मसमर्पण केले आहे. मृत दहशतवाद्यांकडून दोन एके रायफल्स आणि तीन पिस्तुल हस्तगत करण्यात आल्या आहेत.

काश्मिरच्या दक्षिणेला असलेल्या शोपियां जिल्यातील किलूरा परिसरात दहशतवादी लपून बसले असल्याची महिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाला सोबत घेऊन पोलिसांनी या परिसरात सर्च ऑपरेशन सुरु केले. त्यानंतर दशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. प्रत्युत्तरात सुरक्षा दलाने देखील गोळीबार केला. या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले, तर एकाने आत्मसमर्पण केले. सुरक्षा दलाकडून आता त्याची कसून चौकशी केली जात आहे.

 

मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांपैकी शकूर अहमत पारी हा महत्त्वाचा दहशतवादी होता. तो स्पेशल पोलीस ऑफिसर होता, त्यानंतर त्याला शिपाई पदावर बढती दिली होती. मात्र तो एक ४७ घेऊन पळून गेला आणि नंतर दहशतवाद्यांना जाऊन मिळाला. अल बिदर नावाचा एक दहशतवादी ग्रुप देखील त्याने तयार केला होता. त्याच्या या ग्रुपमध्ये १० तरुण सामील झाले होते. मात्र नंतर त्यातील ५ जण मारले गेले, अशी माहिती पोलीस अधिकारी विजय कुमार यांनी दिली.

First Published on: August 28, 2020 8:17 PM
Exit mobile version