Shraddha Murder Case : आरोपी आफताब पूनावालाच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ

Shraddha Murder Case : आरोपी आफताब पूनावालाच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ

श्रद्धा वालकर हत्याकांडातील मुख्य आरोपी आफताब पूनावालाच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. दिल्लीच्या साकेत न्यायालयाने आफताबच्या न्यायालयीन कोठडी 14 दिवसांनी वाढवली आहे. दरम्यान आफताब पूनावाला याने आता कोठडीत अभ्यासासाठी कायद्याच्या काही पुस्तकांची मागणी केली आहे. त्याचबरोबर न्यायालयाने अधिकाऱ्यांना त्याला उबदार कपडे देण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान या प्रकरणाबाबत 4 जानेवारीला डीएनए रिपोर्टमधून एका मोठा खुलासा झाला होता. तपासादरम्यान पोलिसांनी जप्त केलेले केस आणि हाडं ही मृत श्रद्धाचीच असल्याचे डीएनए रिपोर्टमधून स्पष्ट झाले होते. याबाबत दिल्ली पोलिसांनी सांगितले की, नमुन्यांचा माइटोकॉन्ड्रियल डीएन अहवाल पीडितेचे वडील आणि भावाच्या डीएनशी मिळते-जुळते आहे. हे नमुने तपासणीसाठी हैदराबादमधील डीएनए फिंगरप्रिटिंग डायग्नोस्टिक्स सेंटरकडे पाठवण्यात आले होते.

वसईतील श्रद्धा वालकर या तरुणीची 2018 मध्ये बंबल डेटिंग APP द्वारे आरोपी आफताब पूनावालासोबत मैत्री झाली. हे दोघं गेली अनेक महिने लिव्हइन रिलेशनशीपमध्ये राहत होते. दरम्यान 8 मे 2022 रोजी दोघं दिल्लीत शिफ्ट झाले आणि तिथे एका भाड्याच्या घरात राहू लागले.

मात्र अनेक कारणांवरून दोघांमध्ये खटके उडत होते. अशात गेल्या वर्षी 18 मे रोजी आफताबने श्रद्धाची निघृण हत्या केली आणि तिच्या शरीराचे 35 तुकडे करुन ते शहरातील विविध ठिकाणी फेकून दिले, दिल्ली पोलिसांनी श्रद्धाच्या शरीराच्या अवयवांचा शोध घेत मेहरौली जंगल परिसरातून 13 हाडांचे तुकडे जप्त केले. याप्रकरणी दिल्ली पोलिसांकडून अद्यापही तपास सुरु आहे.


…तर शिंदे सरकार नक्कीच पडेलच; अंबादास दानवे यांचा दावा

First Published on: January 10, 2023 1:09 PM
Exit mobile version