बेडगी मिरचीचा तोराच लय भारी, कोरोनातही ठसकेदार कामगिरी

बेडगी मिरचीचा तोराच लय भारी, कोरोनातही ठसकेदार कामगिरी

उकाड्यात वाळवणीच्या गोष्टींमध्ये सगळ्यात महत्वाची अशी गोष्ट म्हणजे मिरची. याच मिरचीच्या प्रकारामध्ये सगळ्यात प्रसिद्ध अशी बेडगी मिरची. वर्षभर वापरण्यात येणाऱ्या मसाल्यात बेडगी मिरचीशिवाय मसाला पुर्ण होत नाही. संपुर्ण भारतभरात लॉकडाऊननंतर मिरची व्यवसायावरही त्याचा परिणाम झाला होता. पण कोरोनाच्या महामारीच्या कालावधीतही बेडगी मिरचीच्या विक्रीवर कोणताही परिणाम झाला नाही. बेडगी मिरचीने अशा संकटाच्या कालावधीतही ठसकदार अशी कामगिरी केली आहे. बेडगी मिरचीचे मार्केट लॉकडाऊनच्या कालावधीतही तेजीतच होते, असेच काहीसं आकडेवारी सांगते.

संपूर्ण देशभरात कोरोनाचा कहर अद्याप संपलेला नाही. साधारण वर्षभरापूर्वी कोरोनाने देशात आपले हात पाय पसरण्यास सुरूवात केली. कोरोनाच्या उद्रेकानंतर देशातील अर्थव्यवस्था चांगलीच कोलमडल्याचे पाहायला मिळाले. कोरोनाच्या उद्रेकानंतर अर्थव्यवस्थेला सामोरे जाण्याची अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान, बेडगी मिरचीची बाजारपेठ ही आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ मानली जाते. कर्नाटक राज्यात बाजारापेठेत बेडगी मिरचीच्या विक्रीतून यंदा लक्षणीय उलाढाल झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सरकारने कोणतीही आर्थिक बाजूंची काळजी करण्याची गरज नाही. तर, राज्य सरकारने यंदाच्या वर्षी ठरवलेल्या लक्ष्यापेक्षा हावेरीच्या बेडगी मिरची बाजारातील विक्रीतून मिळणारं उत्पन्न चांगलं असल्याचे सांगितले जात आहे.

२०२०-२१ या आर्थिक वर्षात ९.५ कोटी रुपये महसूल लक्ष्याच्या तुलनेत यंदा बाजारात झालेली बेडगी मिरचीची विक्री १२ कोटींच्या पुढे गेली आहे. सलग तिसऱ्यांदा बेडगी मिरची बाजारातील विक्रीने लक्ष्य पार केले आहे. तर गेल्या वर्षी बाजारात १९ कोटी रुपयांची चांगली विक्री झाली होती. मात्र त्यावेळी सरकारने ठरविलेले लक्ष्य केवळ १५ कोटी रुपये होते. यासह यंदा भागधारकांनी बाजारातील झालेल्या बेडगी मिरचीच्या विक्रीचे कारण कृषी उत्पन्न बाजार समिती उपकरणाच्या आधीच्या १.५ टक्क्यांवरून ०.६ टक्क्यांपर्यंत कपात केली असल्याचेही सांगितले जात आहे.

यंदा देशात कोरोनाचा कहर झाला असून बेडगी मिरचीची विक्री आणि त्यातून मिळालेले उत्पन्न हे अपेक्षा पेक्षा अधिक झाले आहे. एक टन बेडगी मिरचीच्या किंमतीतील वाढ ही ७५,००० च्या विक्रमी भावाने झाली. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये उत्साही वातावरण असून बेडगी मिरचीच्या पिकाची लागवड सुरूच आहे. एकूणच, २०२०-२१ आर्थिक वर्षात बेडगी मिरचीच्या बाजारात १ हजार ९९७ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची नोंद करण्यात आली होती, तर २०१२-२० मध्ये १ हजार २६० कोटी रुपये इतकी करण्यात आली होती. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत ११,००० क्विंटलपेक्षा जास्त पिकाची विक्री झाल्याने बेडगी मिरचीच्या विक्रीने महसूल उत्पनात कमालीची बाजी मारली आहे.

First Published on: March 30, 2021 2:56 PM
Exit mobile version