सीरमच्या अदर पूनावालांची ब्रिटनमध्ये २४० कोटींची गुंतवणूक, लसींचे उत्पादन वाढवण्यासाठी देणार भर

सीरमच्या अदर पूनावालांची ब्रिटनमध्ये २४० कोटींची गुंतवणूक, लसींचे उत्पादन वाढवण्यासाठी देणार भर

कार्यकारी संचालकांचे वक्तव्य सिरमची अधिकृत भूमिका नाही, अदर पूनावालांकडून स्पष्टीकरण जारी

भारताताील आघाडीची लस उत्पादित कंपनी सीरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक अदर पुनावाला यांनी ब्रिटेनमध्ये गुंतवणूक केली आहे. अदर पुनावाला यांनी एकुण २,४५७.१९ करोड रुपयांची गुंतवणूक केली आहे. यामुळे ब्रिटेनमधील रोजगार वाढणार आहे. पुनावाला यांनी गुंतवणूक केली असून भविष्यात ब्रिटेनमध्येच कोरोना लसीची निर्मितीही सुरु करतील असे ब्रिटेनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी म्हटले आहे. जॉनसनच्या डॉऊनिंग स्ट्रिट ऑफिसच्या माहितीनुसार २४० करोड पॉंडची गुंतवणूक करण्यात आली आहे. यामध्ये क्लिनिकल ट्रायल, रिसर्च आणि लसींचे उत्पादन करण्यात येणार आहे.

सीरम इन्स्टिट्यूट लस उत्पादनाच्या क्षमतेमध्ये देशातील सर्वात मोठी लस उत्पादन करणारी कंपनी आहे. तसेच सीरम कमी खर्चाच्या अॅस्ट्राजेनेका कोरोना लसींचे डोस तयार करण्यातही पुढे आहे. सीरमचे नाकावाटे घेण्यात येणाऱ्या लसीवर देखील यूकेमध्ये पहिल्या टप्प्यातील चाचणी सुरु आहे. सीरम ब्रिटेनमध्ये स्वतःचे नवीन कार्यालय स्थापन करुन आपल्या कोरोना लसींचे उत्पादन वाढवण्याच्या तयारीत आहे. तसेच भारत आणि ब्रिटेनमध्ये व्यापार वाढवण्यासाठी सीरमकडून १ करोड पॉंड गुंतवणूक केली आहे. यामुळे ब्रिटेनमध्ये ६५०० जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

सीरमच्या गुंतवणूकीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जॉन बोरिस यांच्या आभासी बैठक होण्यापूर्वीच घोषणा करण्यात आली आहे. मागील वर्षी ब्रिटनने युरोपियन व्यापार सोडल्यापासून लंडनच्या व्यापाराच्या यादीमध्ये भारत मोठ्या प्रमाणावर आहे. सीरम ६० के ७० दशलक्ष अस्ट्राजेनेका लसींचे डोस बनवण्याच्या तयारीत असून जुलैपर्यंत १०० दशलक्ष डोस बनवण्याची तयारी करत आहे.

नेसल वॅक्सीनची चाचणी सुरु

सीरम इन्स्टिट्यूट ब्रिटेनमध्ये कोडेनिक्स इंक सोबत नेसल वॅक्सीनची निर्मिती करत आहे. नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीची पहिल्या टप्प्यातील चाचणी सुरु आहे. कंपनीच्या नव्या सेल्स ऑफिसमध्ये १०२ अरब रुपयांचा व्यापार होण्याची आशा आहे.

First Published on: May 4, 2021 3:38 PM
Exit mobile version