YASS चक्रीवादळामुळे मध्य रेल्वेच्या काही गाड्या रद्द

YASS चक्रीवादळामुळे मध्य रेल्वेच्या काही गाड्या रद्द

धावत्या ट्रेनखाली उडी घेत तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये मोदींकडे व्यक्त केली इच्छा

दक्षिण पूर्व अरबी समुद्रात तयार झालेले चक्रीवादळ ओसरले असले तरी राज्यात अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. चक्रीवादळामुळे अनेक राज्यात जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसात  अधिक झाडे पडल्याच्या घटना घडल्या. यामध्ये अनेक ठिकाणी घरांवर, रस्त्यावर आणि वाहनांवरही झाडे पडली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वित्तहानीही झाली, मात्र जीवितहानी झालेली नाही. अरबी समुद्रातून अलिबाग, मुंबईच्या दिशेने आलेल्या चक्रीवादळाचा  वातावरणावर परिणाम दिसून आला.रात्रीपासूनच शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. तसेच, जोरदार वारेही सुटले होते.यामुळे चक्रीवादळ यास (YAAS) मुळे रेल्वेगाड्यांचे रद्दीकरण करण्यात आले आहे.

रेल्वेने चक्रीवादळ वायएएसच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर खालील गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तपशिल खाली दिलेल्यानुसार:

अ) ट्रेन क्रमांक ०१०१९  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – भुवनेश्वर विशेष दि. २४ मे २०२१ व २५ मे २०२१ रोजी सुटणारी आणि
ट्रेन क्रमांक ०१०२० भुवनेश्वर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई विशेष दि. २५ मे २०२१ व २६ मे २०२१ रोजी सुटणार.

ब) ट्रेन क्रमांक  ०२१४५ लोकमान्य टिळक टर्मिनस – पुरी विशेष दि. २३ मे २०२१ रोजी सुटणारी आणि ट्रेन क्रमांक ०२१४६  पुरी – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष दि. २५ मे २०२१ रोजी सुटणार.

प्रवाश्यांनी कृपया याची नोंद घ्यावी.


हे हि वाचा – Corona Vaccination: दोन वेगवेगळ्या लसीचे डोस घेण्याबाबत काय म्हणाले केंद्रीय आरोग्य मंत्रालय?

First Published on: May 22, 2021 7:10 PM
Exit mobile version