घरताज्या घडामोडीCorona Vaccination: दोन वेगवेगळ्या लसीचे डोस घेण्याबाबत काय म्हणाले केंद्रीय आरोग्य मंत्रालय?

Corona Vaccination: दोन वेगवेगळ्या लसीचे डोस घेण्याबाबत काय म्हणाले केंद्रीय आरोग्य मंत्रालय?

Subscribe

देशात कोरोना परिस्थिती हळूहळू सुधारताना दिसत आहे. मात्र मृत्यूची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर नीति आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल म्हणाले की, ‘देशात आता कोरोना व्हायरसची स्थितीत नियंत्रणात येते आहे. कोरोना पॉझिटिव्हीटी दर घटत असून सक्रिय रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे देशासाठी ही एक सकारात्मक बाब आहे.’ यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत वीके पॉल यांनी एका व्यक्तीला दोन वेगवेगळ्या लसीचे डोस दिले जाऊ शकतात का? यावर उत्तर दिले.

- Advertisement -

याबाबत वीके पॉल म्हणाले की, एका व्यक्तीने पहिल्या डोस एक लसीचा आणि दुसऱ्या डोस दुसऱ्या लसीचा घेणे हे वैज्ञानिकदृष्ट्या आणि सिद्धांतानुसार शक्य आहे. परंतु अशी स्थिती विकसित होत असल्यामुळे याची शिफारस करणे योग्य नाही. सध्या याबद्दल कोणताही ठाम पुरावा नाही आहे आणि येत्या काळात काय ते समजेल.

- Advertisement -

 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, ‘१० हजारांहून अधिक रुग्णांची नोंद ७ राज्यांमध्ये होत आहे. तर ६ राज्यांमध्ये ५ ते १० हजार दरम्यान रुग्णांची नोंद होत आहे. देशातील ६ राज्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पंजाब आणि दिल्ली या राज्यांचा समावेश आहे.’ देशात आतापर्यंत १९ लाखांहून अधिक लसीकरण पार पडले आहे.


हेही वाचा – देशात कोरोनाचे लाखो मृत्यू अ‍ॅलोपॅथीने, बाबा रामदेव यांचा आरोप, IMA चा निषेध


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -