मुस्लिमांचा सहिष्णू असल्याचा बुरखा केवळ उच्चपदांसाठी; केंद्रीय मंत्र्याचा दावा

मुस्लिमांचा सहिष्णू असल्याचा बुरखा केवळ उच्चपदांसाठी; केंद्रीय मंत्र्याचा दावा

संग्रहित छायाचित्र

 

नवी दिल्लीः मुस्लिम केवळ उच्चपदांसाठी सहिष्णू असल्याचा बुरखा घालत असतात. राज्यपाल किंवा उपराष्ट्रपती पद मिळवण्यासाठी ते सहिष्णू असल्याचे नाटक करतात. त्यांचा खरा चेहरा ते निवृत्त झाल्यावर समोर येतो, अशी टीका केंद्रीय कायदा व न्याय राज्यमंत्री सत्यपाल सिंग यांनी केली आहे.

देव ऋषी नारद पत्रकार पुरस्कार सोहळ्याचे दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मीडिय विंग इंद्रप्रस्थ विश्व संवाद केंद्राने पत्रकार पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. सहिष्णू मुस्लिमांना सोबत घेऊनच कट्टर मुस्लिमांशी लढा द्यायला हवा, असे मत या सोहळ्यात केंद्रीय माहिती अधिकार आयुक्त उदय माहुरकर यांंनी व्यक्त केले होते. ते म्हणाले, अकबराने हिंदु- मुस्लिम ऐक्याला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी अकबराचा हा हेतू सकारात्मक मानला होता.

केंद्रीय माहिती आयुक्त माहुरकर यांनी केलेल्या या मतावर केद्रीय मंत्री बघेल यांनी थेट सहिष्णू मुस्लिमांंवर टीका केली. अकबराने हिंदु-मुस्लिम ऐक्यासाठी कधीच प्रयत्न केले नाहीत. जोधाबाईसोबत विवाह ही अकबरची एक वेगळी निती होती. मुळात सहिष्णू मुस्लिमांची संख्या बोटांवर मोजण्या इतकी आहे. सहिष्णू मुस्लिमांची संख्या हजारांमध्येदेखील नाही. कारण काही मुस्लिम सहिष्णू असल्याचा बुरखा घालतात. या बुरख्याद्वारे त्यांना उपराष्ट्रपती किंवा राज्यपाल पद मिळवण्याचे असते. मात्र निवृत्त झाल्यानंतर त्यांचा खरा चेहरा समोर येतो, असा दावा केंद्रीय बघेल यांनी केला आहे.

केंद्रीय मंत्री बघेल म्हणाले, हिंदू-मुस्लिम ऐक्य अकबरच्या मनातून आले नव्हते. असे असते तर चित्तौडगडचा नरसंहार घडलाच नसता. मुगल काळ व औरंगजेबने जे केले ते बघितले तर आपण कसे जिवंत आहोत याचे आश्चर्य वाटते. ११९२ मध्ये मोहम्मद गौरीने राजपूत राजा पृथ्वीराज चौहान यांना पराभूत केले तेव्हापासून भारताचे वाईट दिवस सुरु झाले.

तलवारीचा धाक दाखवण्यापेक्षा ताविज आणि गंडे घालून मोठ्या प्रमाणात धर्मांतर केले जाते. ख्वाजा ग़रीब नवाज़ साहब, हज़रत निज़ामुद्दीन औलिया, सलीम चिश्ती या ठिकाणी संतान प्राप्ती, नोकरी, निवडणुकीचे तिकिट, मंत्री पद मिळावे यासाठी प्रार्थना केली जाते, असा आरोप केंद्रीय मंत्री बगेल यांनी केला.

केंद्रीय मंत्री बघेल म्हणाले, अल्पसंख्याक समुदायाला असे वाटते की आपण शासक होतो. त्यामुळे प्रजा कसे होऊ शकतो. योग्य शिक्षण न मिळणे ही मुळ समस्या आहे. त्यांना चांगले शिक्षण मिळाले तर सर्व समस्यांचे निरसन होईल. मदरशांमध्ये उर्दु, अरबी आणि फारसी शिकले तर ते इमाम बनतील. पण त्यांनी फिजिक्स किंवा केमिस्ट्रीचे शिक्षण घेतले तर ते अब्दुल कलाम होतील.

 

First Published on: May 9, 2023 4:12 PM
Exit mobile version