आरएसएसप्रमुखांच्या वक्तव्यावरून सोनमची सटकली

आरएसएसप्रमुखांच्या वक्तव्यावरून सोनमची सटकली

अभिनेत्री सोनम कपूर (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

आरएसएसप्रमुख मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी घटस्फोटांच्या वाढत्या प्रमाणावर विधान केले होते. सुशिक्षित लोकांमध्येच घटस्फोटाचे प्रमाण अधिक असल्याचे त्यांनी म्हटले होते. यावरून अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. तर काहीजणांनी भागवतांच्या विधानाचे समर्थन केले. या वादात आता बॉलीवूड स्टार सोनम कपूर हीने उडी घेतली असून तिलाही भागवतांचे विधान झोंबले आहे. कुठली समजदार व्यक्ती असे विधान करू शकते असा सवाल करत तिने भागवतांना लक्ष्य केलं आहे.

तसेच हे अर्थहीन वक्तव्य असल्याचेही तिने टि्वटमध्ये म्हटले आहे. भागवतांनी काही दिवसांपूर्वी घटस्फोटांच्या वाढत्या प्रमाणावर चिंता व्यक्त केली होती. सुशिक्षित घरांमध्येच काडीमोड होण्याचे प्रमाण अधिक आहे. याचे कारण शिक्षण आणि संपन्नतेमुळे व्यक्तीमध्ये अहंभाव वाढीस लागला आहे. यामुळे कुटुंबात दुरावा निर्माण होतोय. भारतात हिंदू समाजाला दुसरा पर्याय नाहीये. असे भागवतांनी म्हटले होते. यावरून वाद निर्माण झाला आहे. भागवतांचे विधान सुशिक्षित लोकांना लक्ष्य करून करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. सोनमनेही यावरच भाष्य केले असून कोणती समजदार व्यक्ती असे विधान करू शकते असे तिने म्हटले आहे.

First Published on: February 17, 2020 3:40 PM
Exit mobile version