चिनी वस्तूंवर बहिष्कार घालणे म्हणजे द्वेष पसरवणे नाही – सोनम वांगचुक

चिनी वस्तूंवर बहिष्कार घालणे म्हणजे द्वेष पसरवणे नाही – सोनम वांगचुक

चिनी वस्तूंवर बहिष्कार घालणे म्हणजे द्वेष पसरवणे नाही - सोनम वांगचुक

इंजिनिअर ते शिक्षा सुधारक सोनम वांगचुक यांनी अलीकडे भारतीयांनी चीन-निर्मित वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते. लडाखमधील वास्तविक सीमारेखावर चीन आणि भारत यांच्यात वाढणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे भारतीयांना आवाहन केले होते. अलीकडेच ‘चीन को जवाब’ व्हिडिओमध्ये सोनम वांगचुक यांनी त्यांच्या ‘Boycott Chinese Products’याबाबत असलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.

ही मोहीम चीनच्या लोकांविरोधात द्वेष पसरवत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. पण यावर सोनम वांगचुक म्हणाले की, ‘या मोहीमेचा चीनच्या लोकांशी काही संबंध नाही. पण ही मोहीम चीन सरकारच्या विरोधात आहे.’ सोनम यांनी या मोहीमेची तुलना स्वातंत्र्यपूर्व काळात बाळ गंगाधर टिळकांच्या स्वदेशी चळवळीशी तुलना केली. या व्हिडिओमध्ये त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

सोनम वांगचुक यांच्या चीन-निर्मित वस्तूंवर बहिष्कार घालण्याच्या मोहिमेला योगगुरू बाबा रामदेव यांनी पाठिंबा दिला आहे. बाबा रामदेव यांनी ट्विट करत असं लिहिलं आहे की, चीन किंवा तिथल्या नागरिकांशी त्यांची कोणतीही दुश्मनी नाही. परंतु देशाविरोधात चिनी कट रोखण्यासाठी त्यांच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकणेही फार महत्त्वाचे आहे.

काय म्हणाले सोनम वांगचुक?

जर भारतात चीनी वस्तूंची खरेदी बंद झाली तर चीनची अर्थव्यवस्था ढासळेल. त्यातून घाबरून ते चर्चेसाठी तयार होतील. जेव्हा सीमेवर तणावाचे वातावरण असते, तेव्हा देशातील नागरिक आपापल्या घरामध्ये निवांत झोपू शकतात. कारण आपल्या रक्षणासाठी सीमेवर आपले जवान तैनात असतात. मात्र आता चीनने दोन्ही बाजूंनी देशावर हल्ला करण्याचे धाडस केले आहे. भारत दरवर्षी साधारण ५ लाख करोड रुपयांचे चीनी सामान विकत घेतो. याच पैशांचा वापर चीनी त्यांच्या लष्करी दलावर करतात. हेच लष्करी सैन्य आपल्या भारतीय सैन्यांवर गोळीबार करत आहेत. त्यामुळे चीनी वस्तूंऐवजी भारतीय वस्तूंना प्राधान्य दिल्यास आपली अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत होईल. तसेच देशातील तरुण उद्योजकांनाही प्रगती करता येईल. यामुळे देशाचीच प्रगती होणार असल्याचेही वांगचुक यांनी म्हटले आहे.


हेही वाचा – चिनी कंपनी शाओमी ११ जूनला पहिला लॅपटॉप MI Notebook करणार लाँच


 

First Published on: June 1, 2020 8:43 PM
Exit mobile version