Omicron Variant : दक्षिण आफ्रिकेने ५० दिवसातच ओमिक्रॉनला घातली वेसण! यशोगाथा वाचाच

Omicron Variant : दक्षिण आफ्रिकेने ५० दिवसातच ओमिक्रॉनला घातली वेसण! यशोगाथा वाचाच

कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरियटने संपूर्ण जगभरासह देशात थैमान घातलं आहे. ओमिक्रॉनचा सर्वात मोठा प्रादुर्भाव दक्षिण आफ्रिकेवर होता. सर्वात पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनचे रूग्ण आढळून आले होते. परंतु ५० दिवसांमध्ये ओमिक्रॉन रूग्णांवर नियंत्रण ठेवण्यास अखेर त्यांना यश आलं आहे. ओमिक्रॉनमुळे जगभरात भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.

वैद्यकीय तज्ञांचं मत काय?

एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. एम्सच्या संचालकांनी सांगितलं की, ओमिक्रॉन धोकादायक नाहीये आणि त्याच्या उपस्थितीत ऑक्सिजनची गरज सुद्धा भासणार नाहीये. ओमिक्रॉन फुफ्फुसांवर नव्हे तर आपल्या श्वसनमार्गावर परिणाम करतो आणि आपल्या शरीरातील श्वसनलिकेतील अँटीबॉडीज त्यास कमकुवत करतात, असा तज्ज्ञांचा विश्वास आहे.

दक्षिण आफ्रिकेतील परिस्थिती नियंत्रणात

दक्षिण आफ्रिकेत नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ओमिक्रॉन आढळून आला होता. त्यानंतर कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची जगभरात चर्चा सुरू झाली. या नवीन प्रकाराबद्दल जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कारण या विषाणूचा प्रसार डेल्टापेक्षा ७० पटीने जास्त आहे. पण आता दक्षिण आफ्रिकेतील परिस्थिती सुधारत आटोक्यात येत आहे. २५ डिसेंबर रोजी नवीन प्रकरणांची संख्या सुमारे ३० टक्क्यांनी कमी झाली आहे. तर दक्षिण आफ्रिकेने जवळपास ५० दिवसांत ओमिक्रॉनवर मात केली आहे.

संचारबंदी हटवली

दक्षिण आफ्रिकेने ओमिक्रॉनच्या लाटेवर नियंत्रण मिळवलं आहे. येथील सरकारने रात्रीची संचारबंदी तात्काळ हटवली आहे आणि इतर निर्बंधही मागे घेण्यास सुरुवात केली आहे. रात्री ११ नंतर दारूची दुकाने उघडण्यास बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच दक्षिण आफ्रिकेने लसीकरणावर भर दिला आहे. त्यामुळे कोरोनाच्या नव्या व्हेरियंटवर नियंत्रण मिळवण्यास मोठी मदत झाली आहे.


हेही वाचा : CDS बिपिन रावत हेलिकॉप्टर क्रॅश दुर्घटना, कायदेशीर बाबींची चौकशी सुरु, कधी येणार अहवाल? जाणून


 

First Published on: January 2, 2022 9:55 AM
Exit mobile version