घरदेश-विदेशCDS बिपिन रावत हेलिकॉप्टर क्रॅश दुर्घटना, कायदेशीर बाबींची चौकशी सुरु, कधी येणार...

CDS बिपिन रावत हेलिकॉप्टर क्रॅश दुर्घटना, कायदेशीर बाबींची चौकशी सुरु, कधी येणार अहवाल? जाणून घ्या

Subscribe

तामिळनाडूमध्ये झालेल्या CDS बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेबाबतचा तीनही दलांचा तपास अहवाल आता पुढील आठवड्यात हवाई दलाच्या मुख्यालयात सादर केला जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या ८ डिसेंबरला तामिळनाडूच्या कुन्नूरजवळ झालेल्या या हेलिकॉप्टर दुर्घटनेत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांच्यासह १३ जणांचा मृत्यू झाला.

अंतिम अहवाल तयार

या दुर्घटनेचा तपास पूर्ण झाला असून येत्या काही दिवसांत अहवाल सादर करण्याआधी अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. एअर मार्शल मानवेंद्र सिंग यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने या दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्या संभाव्य मानवी चुकांसह सर्व संभाव्य पैलूंचा तपास करत चौकशी केली आहे.

- Advertisement -

कायदेशीर प्रक्रिया सुरु

हेलिकॉप्टर उतरण्याच्या तयारीत असताना हेलिकॉप्टर वैमानिकाची दिशाभूल तर झाली नाही ना हेही तज्ज्ञांनी यात तपासले आहे. ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’चे निष्कर्ष आणि त्याद्वारे अवलंबलेली कार्यपद्धती कायदेशीरदृष्ट्या तपासली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

यामुळे झाला अपघात

या घडामोडींशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, तपास पथकाने सर्व नियम आणि प्रक्रियांचे पालन केले आहे याची खात्री करण्यासाठी कायदेशीर तपास केला जात आहे. अपघाताच्या संभाव्य कारणांबद्दल विचारले असता, अनेक हेलिकॉप्टर उड्डाण तज्ञांनी सांगितले की, वैमानिकाने परिस्थितीजन्य जागरूकता गमावल्यास आणि दृश्य भ्रम निर्माण केल्यामुळे अनेक विमान अपघात होतात.

- Advertisement -

सर्व परिस्थितीनुसार तपास

यावर एकाने सांगितले की, खराब हवामानामुळे कधीकधी परिस्थितीजन्य जागरूकता कमी होते. तथापि, कुन्नूर दुर्घटनेबद्दल (MI Helicopter Crash in Coonoor)) बोलण्यास त्यांनी नकार दिला. ते म्हणाले की, तपास पथकाने सर्व संभाव्य पैलू तपासले असून अहवालाला अंतिम स्वरूप दिले आहे. ते आठवडाभरात हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांच्याकडे सुपूर्द करणे अपेक्षित आहे. तथापि, या विषयावर कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -