रात्री घराबाहेर पडू नका; दक्षिण कोरियाकडून भारतातील नागरिकांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी

रात्री घराबाहेर पडू नका; दक्षिण कोरियाकडून भारतातील नागरिकांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी

मुंबईतील खार परिसरात एका कोरियन युट्यूबर तरुणीची छेडछाड केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुरूवारी दोन जणांना अटक केली. अशातच आता या घटनेनंतर दक्षिण कोरियाच्या दूतावासाने मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार, भारतातील कोरियन नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रात्रीच्या वेळी बाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. भारतीय शहरांमध्ये रात्री घराबाहेर पडणे सुरक्षित नाही, असेही त्यांनी म्हटले. (South Korean Embassy Issued Advisory For Its Citizens In India To Not To Go Out At Night)

नेमकी घटना काय?

दक्षिण कोरियाची युट्यूबर तरुणी रात्री वर्दळीच्या वेळी मुंबईत फिरत होती. त्यावेळी तिच्या मोबाईलमध्ये लाइव्ह सुरू होते. तरुणी लाइव्ह करत असताना दोन जणांनी तिच्या जवळ येऊन तिची छेड काढली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी या व्हिडीओमध्ये तरुणीची छेड काढणाऱ्या दोघांना अटक केली. तसेच, या घटनेच्या पार्श्वभूमीवर भारतातील कोरियन नागरिकांच्या सुरक्षेसाठी दक्षिण कोरियाच्या दूतावासाने रात्रीच्या वेळी बाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.


हेही वाचा – स्वच्छ आणि आरोग्यदायी मुंबई! मॉर्निंग वॉकसाठी रात्रीच होणार मैदानांची साफसफाई

First Published on: December 2, 2022 8:49 AM
Exit mobile version