विमान प्रवास होणार स्वस्त; 26 नवीन उड्डाणे होणार सुरु, जाणून घ्या रुट लिस्ट आणि प्रवासी भाडे

विमान प्रवास होणार स्वस्त; 26 नवीन उड्डाणे होणार सुरु, जाणून घ्या रुट लिस्ट आणि प्रवासी भाडे

देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. देशात विविध भागात जाण्यासाठी 26 नवीन उड्डाणे सुरु होणार आहे. यामुळे आता विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत. स्पाईसजेटने देशांतर्गत उड्डाणांमध्ये आपला सहभाग वाढवण्यासाठी देशांतर्गत 26 विमान उड्डाणे सुरु करण्याची घोषणा केली आहे. काही जुन्या मार्गांवरील फ्लाइट्सची संख्याही वाढणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्यामुळे लोकांना विविध शहरात जाण्याची संधी मिळणार आहे. परिणामी विमान भाडही कमी होण्याची अपेक्षा आहे.

या 26 शहरांमध्ये सुरु होणार उड्डाणे

स्पाइसजेट कंपनीने मंगळवारी यासंदर्भातील घोषणा केली आहे. कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार, 22 जुलैपासून 26 नवीन देशांतर्गत विमान उड्डाणे सुरु होणार आहेत. मुंबई-गुवाहाटी, झारसुगुडा-मदुराई, नाशिक-दिल्ली, हैदराबाद-जम्मू, कोलकाता-जबलपूर मार्ग आणि वाराणसी-अहमदाबाद या नवीन मार्गांची नावे आहेत. याशिवाय अमृतसर-अहमदाबाद, दिल्ली-हैदराबाद, अहमदाबाद-जयपूर आणि दिल्ली-धर्मशाला या मार्गांवर आधीपासून चालणाऱ्या फ्लाइटची संख्याही वाढवण्यात येणार आहे.

बोईंग-737 आणि Q400 विमानांचा होणार वापर

स्पाईसजेट कंपनीने सांगितले की, या नवीन शहरांमध्ये सुरू होणाऱ्या उड्डाणांसाठी स्पाईसजेट बोईंग-737 आणि क्यू400 विमानांचा वापर करेल. या विमानांचे भाडे निश्चित करण्यात आले आहे. त्यांच्या नवीन फ्लाइटचे भाडे प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या तुलनेत तर्कसंगत ठेवण्यात आले आहे, जे प्रत्येकाला परवडेल. नवीन शहरांमध्ये विमान सेवा सुरू केल्याने त्या शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढेल, ज्याचा परिणाम तेथील लोकांच्या राहणीमानावर होईल.

गेल्या काही दिवसांपासून कंपनी अडचणीत

स्पाईसजेटला गेल्या काही दिवसांपासून समस्यांचा सामना करावा लागत आहे. प्रत्यक्षात गेल्या एका महिन्यात कंपनीच्या विमानांमध्ये बिघाड झाल्याच्या 8 मोठ्या घटना समोर आल्या. उड्डाण सेवेवर देखरेख ठेवणाऱ्या सरकारी विभाग डीजीसीएने कंपनीच्या विमानांमधील या बिघाडांबाबत चिंता व्यक्त केली आहे. याप्रकरणी डीजीसीएने कंपनीला नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले आहे, तसेच त्या तात्काळ दुरुस्त करण्याचे निर्देश दिले आहेत. नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही रविवारी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत अशा घटनांना अस्वीकार्य असल्याचे म्हणत विमान कंपन्यांना त्यांच्या विमानांमधील उणीवा दूर करण्यासाठी 10 दिवसांचा अल्टिमेटम दिला.


हेही वाचा : वाधवान बंधूंच्या अडचणीत वाढ; सर्वात मोठ्या बँक घोटाळ्याप्रकरणी आठ दिवसांची सीबीआय कोठडी

First Published on: July 20, 2022 9:37 AM
Exit mobile version