देशात कोरोनाचा कहर; २४ तासांत ३४ हजार ८८४ नवे रुग्ण, ६७१ रुग्णांचा मृत्यू

देशात कोरोनाचा कहर; २४ तासांत ३४ हजार ८८४ नवे रुग्ण, ६७१ रुग्णांचा मृत्यू

World record : भारतात 24 तासात कोरोना रूग्णसंख्या वाढीचा विक्रम, ३ लाख १४ हजार नव्या रूग्णांची भर

देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. देशात मागील २४ तासांत सर्वाधिक ३४ हजार ८८४ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची वाढ झाली असून ६७१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा १० लाख ३८ हजार ७१६ वर पोहोचला असून मृतांचा आकडा २६ हजार २७३ झाला आहे. तसेच आतापर्यंत ६ लाख ५३ हजार ७५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या ३ लाख ५८ हजार ६९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १० लाख ३८ हजार ७१६ वर गली आहे. तर मागील २० दिवसांमध्ये तब्बल ५ लाख रुग्णांची वाढ झाली आहे. तर देशात २९ फेब्रुवारीला पहिला रुग्ण आढळल्यानंतर रुग्णसंख्या ५ लाखांवर जाण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागला. तर २६ जूनला ५ लाख असलेली बाधितांची संख्या शुक्रवारी १० लाखांच्या पुढे गेली आहे. म्हणजेच देशात अवघ्या २० दिवसांत दुप्पट रुग्णवाढ झाली.

२६ हजार २७३ जणांचा मृत्यू

देशात आतापर्यंत करोनामुळे २६ हजार २७३ जणांचा मृत्यू झाला आहे तर अद्याप तीन लाख ५८ हजार ६९२ जणांवर उपचार सुरू आहेत.


हेही वाचा – ‘दिशा कायदा’ ही केवळ घोषणाचं होती का? चित्रा वाघ यांचा सवाल


 

First Published on: July 18, 2020 10:09 AM
Exit mobile version