घरताज्या घडामोडी‘दिशा कायदा’ ही केवळ घोषणाचं होती का? चित्रा वाघ यांचा सवाल

‘दिशा कायदा’ ही केवळ घोषणाचं होती का? चित्रा वाघ यांचा सवाल

Subscribe

सुरक्षा यंत्रणा, प्रशासन यंत्रणा काय करत होती? महिलांसाठी असलेला दिशा कायदा ही केवळ घोषणाच होती का'?, असा संतप्त सवाल भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांनी केला आहे.

पनवेलमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेल्या एका महिलेवर क्वारंटाईन असलेल्याच एका युवकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर घटनेमुळे पनवेल मधील क्वारंटाईन सेंटरची सुरक्षा धोक्यात आली आहे. सदर प्रकारामुळे पनवेलमध्ये एकच खळबळ माजली असून या प्रकरणावरुन आता भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी देखील सरकारवर निशाणा साधला आहे. ‘महिलांच्या क्वारंटाईन कक्षाकडे पुरुष रुग्ण पोहचला कसा? सुरक्षा यंत्रणा, प्रशासन यंत्रणा काय करत होती? महिलांसाठी असलेला दिशा कायदा ही केवळ घोषणाच होती का’?, असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.

काय म्हणाल्या चित्रा वाघ?

‘पनवेल क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलेवर झालेला बलात्कार हा कोरोनापेक्षाही भयानक आहे. यापूर्वीही अशा सेंटरमध्ये महिलांसोबत लैंगिक अत्याचार आणि विनयभंगाचे गुन्हे घडले आहेत. महत्त्वाचे म्हणजे महिलांच्या क्वारंटाईन कक्षाकडे पुरुष रुग्ण पोहचतातच कसे? सुरक्षा यंत्रणा, प्रशासन काय करत असते?,’ असे सवाल चित्रा वाघ यांनी केले आहेत.

- Advertisement -

- Advertisement -

‘या घटनेतील आरोपीला अटक झाली आहे. पण, त्यासोबत क्वांरटाईनसेंटरच्या सुरक्षेसाठी असलेले सुरक्षारक्षक, तिथले प्रशासनही तेव्हढेचं जबाबदार आहे. उपचारासाठी दाखल झालेल्या भगिनीही सुरक्षित नाहीत. महिला सुरक्षेसाठीच्या ‘दिशा कायद्या’चं काय झालं की ती फक्त घोषणा होती,’ अशी विचारणाही त्यांनी सरकारला केली आहे.

संबधित प्रकार गुरूवारी मध्यरात्री घडल्याचा खुलासा सूत्रांकडून सांगण्यात येत असून क्वारंटाईन सेंटमध्येच कोरोना संशयित म्हणून दाखल झालेल्या एका महिलेवर एका विकृत तरुणाने बलात्कार केल्याची माहिती पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने देण्यात आली आहे. सध्यस्थीतीत पनवेल महापालिका प्रशासन कोरोनाला रोखण्यासाठी अनेक प्रयत्न करीत आहेत. मात्र, थेट रुग्णाने अशी विकृती केल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी याबाबत तत्काळ कारवाई करत कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पनवेल पोलीस अधिक तपास करत आहेत.


हेही  वाचा – धक्कादायक: पनवेलमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलेवर बलात्कार


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -