SriLanka Economic Crisis: देशव्यापी आंदोलनापूर्वी श्रीलंकन सरकारने लावला ३६ तासांचा कर्फ्यू; सोशल मीडियावर बंदी

SriLanka Economic Crisis: देशव्यापी आंदोलनापूर्वी श्रीलंकन सरकारने लावला ३६ तासांचा कर्फ्यू; सोशल मीडियावर बंदी

SriLanka Economic Crisis: देशव्यापी आंदोलनापूर्वी श्रीलंकन सरकारने लावला ३६ तासांचा कर्फ्यू; सोशल मीडियावर बंदी

श्रीलंका सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. श्रीलंकेतील जनता वीज, घरगुती गॅसच्या तीव्र टंचाईमुळे हैराण झाली आहे. रविवारी देशव्यापी मोठ्या आंदोलनापूर्वी घाबरलेल्या सरकारने अगोदरच ३६ तासांचा कर्फ्यू लावला आहे. श्रीलंकन सरकारने देशाच्या इतिहासात सर्वात मोठ्या आर्थिक संकटबाबत आज होणाऱ्या आंदोलनापूर्वी शनिवारी पूर्ण देशात ३६ तासांचा कर्फ्यू जाहीर केला. यापूर्वी राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी शुक्रवारी रात्री उशीरा एक सूचना जारी करून श्रीलंकेत १ एप्रिलपासून सार्वजनिक आणीबाणी लागू करण्याची घोषणा केली होती. दरम्यान कर्फ्यू लावल्यानंतर सरकारने सोशल मीडियावरही बंदी घातली आहे. आजपासून श्रीलंकेत फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामसह सर्व सोशल मीडियावर प्लेटफॉर्म आऊट ऑफ सर्व्हिस केले आहे. शनिवारी उशीरा रात्रीपासून कोलंबोसह काही शहरांमध्ये सोशल मीडिया प्लेटफॉर्मचे काम बंद झाले आहे.

सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत असणार कर्फ्यू

आज देशात जागो जागी होणाऱ्या आंदोलन रोखण्यासाठी श्रीलंकन सरकार कठोर पाऊल उचलत आहे. श्रीलंकेत शनिवारी संध्याकाळी ६ वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. जेणेकरून लोकं आंदोलनात सहभाग घेऊ शकणार नाहीत. दरम्यान कर्फ्यू दरम्यान अत्यावश्यक सेवेतील लोकांना ओळखपत्राद्वारे येण्या-जाण्यास सूट देण्यात आली आहे. याशिवाय राजनैतिक मिशनचे सर्व कर्मचारी सदस्य आयडी दाखवून प्रवास करू शकता. तसेच कर्फ्यू दरम्यान रस्ते, पार्क, रेल्वे, समुद्र किनाऱ्यांसह सर्व सार्वजनिक ठिकाणांवर बंदी घालण्यात आली आहे.

श्रीलंकन सरकारच्या मते, आतापर्यंत झालेल्या आंदोलनात ३ कोटी ९० लाख रुपयांच्या सरकारच्या संपत्तीचे नुकसान झाले आहे. मिरहाना भागातील राष्ट्रपती निवासस्थानाजवळील आंदोलनात आतापर्यंत १७ पोलीस अधिकारी गंभीर स्वरुपात जखमी झाले आहेत.

श्रीलंकेमधील आर्थिक संकटामुळे कोलंबोमध्ये १३-१३ तास वीज कापली जात आहे. त्यामुळे जनता रस्त्यावर उतरली असून राष्ट्रपतींच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. लोकांकडे खाण्या-पिण्याच्या वस्तू नाहीयेत. त्यामुळे लोकं हिंसक आंदोलन करत आहे.


हेही वाचा – Emergency In Sri Lanka: श्रीलंकेत परिस्थिती हाताबाहेर, राष्ट्रपतींनी जाहीर केली आणीबाणी


First Published on: April 3, 2022 11:39 AM
Exit mobile version