श्रीलंकेच्या पंतप्रधानांविरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव मंजूर

श्रीलंकेच्या पंतप्रधानांविरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव मंजूर

श्रीलंकेचे पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे

श्रीलंकेचे पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांच्याविरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव मंजूर केला आहे. संसदेचे अध्यक्ष कारू जयसुर्या यांनी आज याबद्दल माहिती दिली. श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे सांगितले जात आहे. Reaters या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार बहुमताने हा प्रस्ताव पारित झाला असल्याचे कळते.

श्रीलंकेत सध्या बरीच राजकीय उलथापालथ सुरु आहे. २६ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती सिरीसेना यांनी तत्कालीन पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांना बरखास्त केले होते. त्याजागी राजपक्षे यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर आवश्यक पाठबळ मिळवण्यासाठी १६ नोव्हेंबरपर्यंत संसद बरखास्त करण्यात आली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने दणका दिल्यानंतर सिरीसेना यांनी आज अचानक अधिवेशन बोलवले. आजच्या अविश्वास प्रस्तावादरम्यान संसदेच्या २२५ सदस्यांनी राजपक्षेंच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा दिला.

लंकेच्या राजकारणात खळबळ, महिंदा राजपक्षे बनले नवे पंतप्रधान!

अविश्वास प्रस्तावाच्या मंजूरीनंतर विक्रमसिंघे यांच्या सयुंक्त राष्ट्रीय पक्ष (UNP) पक्षाचे नेते सजिथ प्रेमदासा यांनी माध्यमांना सांगितले की, “सरकारने सभागृहातला विश्वास गमावला आहे. त्यामुळे राजपक्षे यांनी सत्तेतून पायउतार व्हावे, कारण त्यांच्याकडे आता बहुमत उरलेले नाही.”

श्रीलंकेच्या सुप्रीम कोर्टाने काल सिरीसेना यांचा सरकार बरखास्त करुन जानेवारी महिन्यात मध्यवर्ती निवडणुका घेण्याच्या निर्णयाला स्थिगिती दिली. कोर्टाने ७ डिसेंबर पर्यंत अंतरिम स्थिगिती दिली आहे. तीन न्यायाधीशांचे खंडपीठ ४, ५ आणि ६ डिसेंबर रोजी याची सुनावणी घेणार आहे.

First Published on: November 14, 2018 2:32 PM
Exit mobile version