घरदेश-विदेशलंकेच्या राजकारणात खळबळ, महिंदा राजपक्षे बनले नवे पंतप्रधान!

लंकेच्या राजकारणात खळबळ, महिंदा राजपक्षे बनले नवे पंतप्रधान!

Subscribe

रानिल आणि मैत्रीपाला यांच्यात काही मुद्यांवर मतभेद निर्माण झाले. त्यामुळे मैत्रीपाल यांनी युती तोडली आणि राजपक्षे यांच्या पक्षासोबत हातमिळवणी केली.

श्रीलंकेच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होताना दिसत आहेत. माजी राष्ट्रध्यक्ष महिंदा राजपक्षे हे श्रीलंकेचे नवे पंतप्रधान बनले आहेत. शुक्रवारी विद्यमान राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाला श्रीसेना यांनी पंतप्रधान पदाची धुरा राजपक्षेंच्या हातात सोपवली आहे. हे तेच राष्ट्रध्यक्ष आहेत जे राजपक्षे यांच्यासोबत राष्ट्रध्यक्ष पदाच्या निवडणूकीत समोरासमोर उभे राहिले होते आणि राजपक्षेंचा त्या निवडणूकीत पराभव झाला होता. आपल्याच विरोधकाला आपल्याच सत्तेत महत्त्वाचे पद देऊन मैत्रीपाला यांनी सगळ्यांना आश्चर्यचकीत केले आहे.

मतभेदामुळे युती तोडली

राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाला श्रीसेना यांनी २०१५ पासून यूनायटेड नेशनल पार्टी (यूएनपी) सोबत मैत्री केली होती. त्यामुळे यूएनपी पक्ष आणि मैत्रीपाला यांचा पक्ष सत्तेत होता. युतीनुसार मैत्रीपाला राष्ट्राध्यक्ष झाले होते तर यूएनपी पक्षाचे रानिल विक्रमासिंघे यांनी पंतप्रधान पदाची सुत्रे हाती घेतले होते. परंतु, रानिल आणि मैत्रीपाला यांच्यात काही मुद्यांवर मतभेद निर्माण झाले. त्यामुळे मैत्रीपाल यांनी युती तोडली आणि राजपक्षे यांच्या पक्षासोबत हातमिळवणी केली.

- Advertisement -

राजपक्षेंचे पद धोक्यात?

राजपक्षे यांनी पंतप्रधान पदाची सुत्रे जरी हाती घेतले असले तरी त्यांचे पद कधीही जाऊ शकते. सत्तेत राहण्यासाठी ११३ जागांचे बहुमत हवे आहे. परंतु, राजपक्षे आणि मैत्रीपाला यांच्या दोन्ही पक्षांचे मिळून ९५ जागा आहेत. त्यामुळे राजपक्षे यांचे पद फार काळ टिकू शकणार नाही. शिवाय, रानिल यांच्या पक्षाकडे १०६ जागा असून बहुमतासाठी त्यांना फक्त ७ जागा लागणार आहेत. त्यामुळे श्रीलंकेच्या राजकारणात आणखीन काही उठाठेव होणार असल्याचे संकेत जाणवू लागले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -