श्रीलंकेत आणखी एक ब्लास्ट; ८७ डेटोनेटर्स सापडले

श्रीलंकेत आणखी एक ब्लास्ट; ८७ डेटोनेटर्स सापडले

श्रीलंका साखळी बॉम्बस्फोट

रविवारी आठ साखळी बॉम्बस्फोटाने हादरलेल्या श्रीलंकेमध्ये पुन्हा एकादा श्रीलंकेत आणखी एक स्फोट झाला आहे. कोलंबोतील एका चर्च जवळील बॉम्ब निकामी करताना हा स्फोट झाला असून त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, कोलंबोच्या मुख्य बस स्थानकावर ८७ डेटोनेटर्स सापडल्याने श्रीलंकेत खळबळ उडाली आहे. आज सकाळी कोलंबो एअरपोर्टच्या परिसरामध्ये सहा फूटी पाईपमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता. त्यानंतर येथील एका चर्चजवळील गाडीमध्ये बॉम्ब असल्याची खबर मिळाल्यानंतर बॉम्बविरोधी पथकाने घटनास्थळी धाव घेऊन बॉम्ब निकामी करण्यास सुरुवात केली. त्या दरम्यान जोरदार स्फोट झाला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. बॉम्बचा स्फोट होताच या गाडीचा चक्काचूर झाला आणि गाडीने पेट घेतला. त्यामुळे या परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

आतापर्यंत २९० जणांचा मृत्यू

श्रीलंका साखळी बॉम्बस्फोटाने हादरला आहे. रविवारी इस्टर संडेला श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये ८ साखळी बॉम्बस्फोट करण्यात आले. या बॉम्बस्फोटात आतापर्यंत २९० जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर ५०० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी १३ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने नाही.

१३ संशयितांना अटक

श्रीलंकेत ८ ठिकाणी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी आतापर्यंत १३ संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. श्रीलंका सरकारने सांगितले की, यामधील जास्त बॉम्बस्फोट हे आत्मघाती होता. मृतांमध्ये भारतीय आणि पाकिस्तानींसह एकूण ३५ परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या बॉम्बस्फोटात ३ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हे तिघेही केरळचे राहणारे आहेत.


हेही वाचा – कोलंबो एअरपोर्टवर पाईपमध्ये बॉम्ब सापडल्याने पुन्हा खळबळ

हेही वाचा – साखळी बॉम्बस्फोट : श्रीलंकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर


 

First Published on: April 22, 2019 8:56 PM
Exit mobile version