घरदेश-विदेशसाखळी बॉम्बस्फोट : श्रीलंकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर

साखळी बॉम्बस्फोट : श्रीलंकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर

Subscribe

रविवारी श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर संपूर्ण श्रीलंका हादरली आहे. त्याच पार्श्वभूमीवर श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपला सिरिसेना यांनी देशात आणीबाणी जाहीर केली आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून संपूर्ण देशभरात आणीबाणी लागू केली आहे. रविवारी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये सुमारे ३०० नागरिक मृत्यूमुखी पडले असून ५०० जखमी झाले आहेत. यासंदर्भात श्रीलंकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार परिषदेच्या झालेल्या बैठकीमध्ये आणीबाणी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. श्रीलंकेचे राष्ट्रपती या परिषदेचे पदसिद्ध सभापती आहेत.

रविवारी सकाशळी ८ वाजून ४५ मिनिटांनी श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये पहिला बॉम्बस्फोट झाला. त्यानंतर दुपारी ४ पर्यंत तब्बल ८ बॉम्बस्फोट झाले. यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या ३०० जणांपैकी ३५ परदेशी नागरिक असून त्यातले ७ भारतीय नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे. या बॉम्बस्फोटांसाठी श्रीलंकेतली स्थानिक नॅशनल तौहीद जमात(एनटीडे) जबाबदार असल्याचं श्रीलंकन सरकारचे प्रवक्ते राजीथा सेनारत्ने यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत २४ लोकांना अटक केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -