SSC Exam Result : दहावीच्या परीक्षेत ९४ टक्के, तरीही नापास; काय आहे प्रकार?

SSC Exam Result : दहावीच्या परीक्षेत ९४ टक्के, तरीही नापास; काय आहे प्रकार?

नवी दिल्ली : देशभरासह राज्यातील SSC आणि HSC बोर्डाच्या परीक्षा महिन्यांभरापूर्वी पार पडल्या असून निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांचे आणि पालकांच्या लक्ष लागले आहे. असे असताना उत्तरप्रदेशमध्ये SSC आणि HSC बोर्डाच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (२५ एप्रिल) लागला आहे. या निकालात एका विद्यार्थींनीला SSC मध्ये तब्बल ९४ टक्के गुण तरी तिला नापास करण्यात आल्यामुळे बोर्डाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.

भावना वर्मा (Bhavana Varma) असे विद्यार्थीनीचे नाव असून ती अमेठी शहरातील शिव प्रताप इंटर कॉलेजची (Shiv Pratap Inter College) विद्यार्थिनी आहे. तिला लेखी परीक्षेत 600 पैकी 402 गुण, तर प्रॅक्टिकलमध्ये १८० पैकी फक्त १८ गुण देण्यात आले आहेत. त्यामुळे ९४ टक्के गुण मिळूनही ती दहावीच्या परीक्षेत नापास झाली आहे. प्रॅक्टिकलमध्ये कमी गुण मिळाल्यामुळे ती नापास झाल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. मात्र बोर्ड अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थीनी नापास झाल्याचे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

हेही वाचा – SCOच्या बैठकीत एस जयशंकर आणि बिलावल भुट्टो यांची भेट होणार का?

भावना अभ्यासात हुशार
भावनाच्या शाळेतील शिक्षकांनी सांगितले की, ती अभ्यासात हुशार आहे. तिला आम्ही प्रॅक्टिकलमध्ये प्रत्येक विषयात ३० पैकी ३० गुण दिले होते. मात्र, बोर्डाच्या चुकीमुळे तिला प्रत्येक विषयात फक्त ३ गुण मिळाल्याचे दिसत आहे. त्यामुळेच ती नापास झाली असल्याचा आरोप शाळेतील शिक्षकांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, भावनाला आम्ही प्रत्येक विषयाच्या प्रॅक्टिकलसाठी ३० दिले आहेत, त्यामुळे ती ६०० पैकी ५६२ गुणांसह जास्त टक्केवारीने पास होणे अपेक्षित होते, मात्र बोर्डाच्या एका चुकीमुळे ती नापास झाली आहे.

नापास झाल्यानंतर मानसिक तणावात भावना
दरम्यान, बोर्डाच्या एका चुकीमुळे भावनाला मोठा धक्का बसला आहे. ती सध्या मानसिक तणावात आहे. बोर्डाच्या चुकीप्रकरणी चौकशी व्हावी यासाठी तिचे कुटुंबीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहणार आहेत. त्यांच्या पत्राची दखल मुख्यमंत्री घेणार का हे पाहावे लागेल.

First Published on: April 26, 2023 5:44 PM
Exit mobile version