एसबीआय ग्राहकांना ‘होम लोन’ मध्ये असा होणार फायदा

एसबीआय ग्राहकांना ‘होम लोन’ मध्ये असा होणार फायदा

अलिकडेच रिझर्व बॅँकेने रेपो रेटमध्ये पाव टक्के कपात केली होती. एसबीआय आपले व्याजदर थेट रेपो रेटशी संलग्न करणार असल्याने त्याचे फायदे गृहकर्जाच्या ग्राहकांना मिळणार आहेत. खरे तर बॅँकांचे व्याजदर ‘मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस लॅँडिंग रेटस्’ वरून ठरविले जातात. परिणामी अनेकदा रिझर्व बॅँकेकडून व्याजदरात कपात होऊनही बॅँका आपल्या ग्राहकांच्या गृहकर्जावरील व्याजदरात कपात करत नाहीत. मात्र एसबीआयने व्याज दर रेपो रेटशी जोडल्याने कर्जाच्या हफ्त्यांवरील व्याजदरही घटणार आहेत.

रेपो रेट पाव टक्के घटविल्यानंतर एसबीआयसह अनेक बॅँकांनी त्यांच्या गृहकर्जावरील व्याजदरात कपात केली. एसबीआयने 30 लाखांपर्यंतच्या गृहकर्जावरील व्याजदरात 0.10 टक्के कपात केली आहे. त्यामुळे गृह कर्जावरील व्याजदर 8.60 ते 6.90 या दरम्यान झाले आहेत. यापूर्वी ते 8.70 ते 8.90 या दरम्यान होते. याशिवाय एसबीआय ने एमसीएलआर दरात 0.05 पॉईंटची कपात केली आहे. 2017 साली ही एसबीआयने एमसीएलआर दरात 5 बेसिक पॉईंटची कपात केली होती.

First Published on: April 17, 2019 3:25 PM
Exit mobile version