शेअर बाजारात उसळी, सेन्सेक्स ७०० अंकांनी वाढून ५५,४८६वर, निफ्टी १६५६२ अंकांवर

शेअर बाजारात उसळी, सेन्सेक्स ७०० अंकांनी वाढून ५५,४८६वर, निफ्टी १६५६२ अंकांवर

शेअर बाजाराचा वेग आजही कायम असून बाजार मोठ्या अंकांनी उघडला आहे. आशियातील बाजारात आज जबरदस्त तेजी असल्यामुळे भारतीय बाजारालाही मोठा आधार मिळाला आहे. आज, देशांतर्गत बाजारात सेन्सेक्स ७०० हून अधिक अंकांच्या उसळीसह उघडण्यात यशस्वी झाला आहे.

बीएसईचा ३० शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स ७१८.५० अंक किंवा १.३१ टक्क्यांच्या वाढीसह ५५,४८६.१२ वर आणि एनएसईचा ५० शेअर निर्देशांक निफ्टी २२२.२५ अंकांच्या वाढीसह १६,५६२.८० वर ओपन झाला आहे. व्यापक बाजाराबद्दल बोलायचे झाले तर, आज २ हजारहून अधिक शेअर्स वाढीच्या हिरव्या चिन्हात व्यवहार करत आहेत आणि केवळ १७० शेअर्सवर घसरणीचा लाल चिन्ह दिसत आहे. बँक निफ्टी आता ३५ हजार ९६८ च्या पातळीवर व्यवहार करत असून त्यात २४८ अंकांची वाढ झाली आहे.

आयटी शेअर्स १.७२ टक्क्यांनी वाढले आहेत. यावेळी मेटलचे शेअर्स १.०८ टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहेत. ग्राहकोपयोगी वस्तू, एफएमसीजी, ऑटो, मीडिया, फार्मा ही सर्व क्षेत्रे जलद होणाऱ्या डीलमुळे वर जात आहेत.

प्री-ओपनिंगमध्ये, NSE चा निफ्टी २१६ अंकांनी किंवा १.३३ टक्क्यांनी वाढून १६ हजार ५५७ च्या पातळीवर आणि BSE सेन्सेक्स ७१८.५० अंकांनी किंवा ५५४८६.१२ ची पातळी प्री-ओपनिंगमध्ये दिसत आहे. बँक निफ्टीने प्री-ओपनिंगमध्येच ३६ हजाराचा टप्पा ओलांडला आहे.


हेही वाचा : रस्त्याचे डांबर पाण्यात विरघळले.., नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका


 

First Published on: July 20, 2022 10:00 AM
Exit mobile version