Share Market : रशिया-युक्रेन वादामुळे शेअर बाजार गडगडला, सेन्सेक्स ८८५ तर निफ्टी २५५ अंकांनी घसरला

Share Market : रशिया-युक्रेन वादामुळे शेअर बाजार गडगडला, सेन्सेक्स ८८५ तर निफ्टी २५५ अंकांनी घसरला

मागील काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन सीमेवर तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. परंतु त्याचा फटका भारताला बसला असून शेअर बाजारात मोठी पडझड झाली आहे. शेअर बाजार सुरू झाल्यानंतर सेन्सेकग्स ८८५ अंकांनी तर निफ्टी २५५ अंकांनी घसरला आहे. निफ्टीमध्ये जवळपास २.०८ टक्क्यांची घसरण झाली आहे. सेन्सेक्स सकाळच्या दरम्यान ५६,७९८ अंकांवर ट्रेड करत होता. तर निफ्टी १६,९४९ अंकांवर ट्रे़ड करत होती.

शेअर बाजारातील सर्वच क्षेत्रातील स्टॉक्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली असून बँकिंग क्षेत्रातील शेअर्स गडगडले आहेत. मिड कॅप, स्मॉल कॅपमध्येही मोठ्या प्रमाणावर घसरण दिसून आली आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती आणि सोन्याच्या किमतींचा जागतिक बाजारावरही परिणाम होत आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीने सात वर्षांतील उच्चांक गाठला आहे. तसेच सोन्याचा भावही ५० हजारांच्या पुढे गेला आहे.

दुसरीकडे, निफ्टी बँकेतही ५०० हून अधिक अंकांची घसरण पहायला मिळत आहे. आयटी, ऑटो, फार्मा या क्षेत्रांतही हिच स्थिती आहे. निफ्टीच्या मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये २ टक्क्यांची घसरण झाली आहे. भारत VIXने व्यापक बाजार आणि क्षेत्रीय निर्देशकांसह १९ टक्क्यांहून अधिक झेप घेतली आहे.

मॉस्को शेअर बाजारात काल(सोमवार) तब्ब्ल १४ टक्क्यांनी कोसळला. राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात युक्रेनसोबत संघर्षाचे संकेत मिळत होते. आंतरराष्ट्रीय बाजारावरही तणावाचे युद्ध दिसून आले. मॉस्को शेअर बाजारात निर्देशांक आरटीएसमध्ये रशियातील ५० मोठ्या कंपन्यांचे प्रतिनिधीत्व करतो. युद्ध सुरू झाल्यानंतर रशियावर पाश्चिमात्य देशांकडून निर्बंध लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


हेही वाचा : viral video : अस्सल खवय्या! कचोरीसाठी फाटकातच थांबवली ट्रेन, अन् पुढे झालं असं काही…


 

First Published on: February 22, 2022 12:57 PM
Exit mobile version