प्रचारासाठी जवानांचे फोटो वापरु नका – निवडणूक आयोग

प्रचारासाठी जवानांचे फोटो वापरु नका – निवडणूक आयोग

निवडणूक आयोगाचा 'तो' टोल फ्री नंबर फक्त जिओसाठीच रिचेबल

काही दिवसांवर लोकसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्यापूर्वीच प्रत्येक राष्ट्रीय पक्ष, स्थानिक पक्षांच्या प्रचारास सुरूवात झाली आहे. पुलवाला हल्ला, भारतीय वायुसेनेने केलेले एअर सर्जिक्ल स्ट्राइक, विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांचे पाकिस्तानमध्ये कैद आणि त्यांची २ दिवसांनी पाकिस्तानातून झालेली सुटका या सगळ्या घटनांचा उपयोग आगामी निवडणुकीमध्ये मतदार खेचण्यासाठी अनेक पक्षांनी कंबर कसली आहे. मात्र, कोणत्याही पक्षांनी संरक्षण दलाच्या कोणत्याही सैनिकांचे किंवा शहीद जवानांचे निवडणुक प्रचार साहित्य म्हणून वापरू नये, अशी सक्त ताकीद निवडणुक आयोगाने शनिवारी दिली आहे. याबाबत केंद्रीय निवडणुक आयोगाने जाहिर प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.

प्रचारासाठी जवानांचे फोटो वापरु नका – निवडणूक आयोग

निवडणुक आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार…

‘संरक्षण विभागामधील व्यक्तींची छायाचित्रे विविध पक्ष आणि उमेदवारांकडून  निवडणुक प्रचारकरण्यासाठी वापर केले जात असल्याची माहिती संरक्षण विभागाने निवडणुक आयोगाला दिली. याप्रकरणी पक्षांना समज देण्याची विनंती संरक्षण विभागाने केली आहे. निवडणुक आयोगाकडून उपरोक्त निर्देश दिल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच सशस्त्र दलाचा राजकारणाशी किंवा निवडणुकीशी थेट संबंध येत नाही. सशस्त्र दल देशाच्या सीमावर लढण्याची, नागरिकांच्या संरक्षणातची भूमिका बजावत असतात. त्यांच्या कामगिरीचा उपयोग निवडणुकींसाठी केला जाऊ नये’, असे या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

First Published on: March 10, 2019 10:27 AM
Exit mobile version